Ashadhi Wari: आषाढीसाठी विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू

आषाढीसाठी विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू
Ashadi ekadashi
Ashadi ekadashiSaam tv
Published On

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचे दर्शन आजपासून 24 तास खुले करण्यात आले. परंपरेनुसार विठ्ठलाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आला. तर विठ्ठलाच्या पाठी मऊमुलायम तक्या आजपासून (Pandharpur) ठेवण्यात आला आहे. (pandharpur news 24 hour darshan of Vitthal for Ashadi ekadashi)

Ashadi ekadashi
रेल्वे पॅन्ट्रीकारमध्ये अन्‍न शिजविणे आता कठीण; गॅस वापरण्यास बंदी

आषाढी एकादशीनंतर (Ashadhi Ekadashi) होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास खुले असणार आहे. प्रक्षाळ पूजेनंतरच पुन्हा एकदा विठ्ठलाचे राजोपचार पूर्ववत होतील. या कालावधीत केवळ (Ashadhi Wari) विठ्ठलाची नित्यपूजा व सायंकाळी विठ्ठलाला लिंबू पाण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो.

नित्य होणारे राजोपचार बंद

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सहज सुलभ दर्शन घेता यावे. यासाठी 24 तास विठ्ठलाचे दर्शन आता खुले असणार आहे. यासाठी आजपासून विठ्ठलाचे नित्य होणारे राजोपचार देखील बंद करण्यात आले. दरम्यान यंदाच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com