Iraq FIre News Saamtv
देश विदेश

Iraq Hostel Fire News: विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात भीषण अग्नितांडव; १४ जणांचा मृत्यू; १८ जखमी

Iraq University FIre News: इराकच्या उत्तरेकडील शहर असलेल्या एरबिल येथील विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. याआगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

Iraq Fire News:

एक मोठी बातमी समोर आली आहे. इराकच्या उत्तरेकडील शहर असलेल्या एरबिल येथील विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. याआगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी (8 डिसेंबर) ८ च्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत इराकमधील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एरबिल शहराच्या पूर्वेला असलेल्या सोरान या छोट्याशा शहरात एका वसतिगृहाच्या इमारतीला भीषण आग लागली. ज्यामध्ये १४ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर १८ विद्यार्थी जखमी झालेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा ही आग विझवण्यात आली. सोरानच्या आरोग्य निदेशालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरूर बरझानी यांनी या घटनेबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वारंवार घडतात आगीच्या घटना...

इराकमध्ये इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. सप्टेंबरमध्ये, उत्तर इराकच्या कराकस शहरातील एका फंक्शन हॉलमध्ये लग्नादरम्यान लागलेल्या आगीत सुमारे शंभर लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास केला असता इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झिट नसल्याचे समोर आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT