Stampede in Kerala College : कोचीमध्ये संगीत कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू; 46 जण जखमी

Kerala News : कोचीमध्ये संगीत कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू; 46 जण जखमी
Stampede in Kerala College
Stampede in Kerala College Saam Tv
Published On

Stampede in Kerala College :

केरळमधील कोची येथे एका संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन विद्यार्थिनींचाही समावेश. जखमींना कळमशेरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून सध्या 46 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. गायिका निकिता गांधी हिच्या गायनाचा कार्यक्रम 6 वाजता सुरू होणार होता, जो साडेसात वाजता सुरू झाला, तोपर्यंत येथील मैदान पूर्ण भरून गेले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Stampede in Kerala College
India Canada News : तपास पूर्ण न करताच केले आरोप, निज्जर प्रकरणी भारतीय राजदूतांनी कॅनडाची काढली खरडपट्टी

कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती. त्याच क्षणी अचानक मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर बाहेर उभे असलेले लोक आत पळू लागले आणि गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि हा अपघात झाला, असं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

कुलगुरू काय म्हणाले?

याबाबत देताना महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. शंकरन म्हणाले, " टेक्निकल फेस्टचा एक भाग म्हणून संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. दुर्दैवाने, गर्दी खूप होती आणि पाऊस पडला. पायऱ्यांमुळे काही समस्या निर्माण झाल्या आणि काही विद्यार्थी पडले... जखमींची संख्या मी उद्याच सांगू शकत नाही. यात 2,000 पेक्षा जास्त लोक सामील होते, 2 विद्यार्थी गंभीर आहेत."

Stampede in Kerala College
Rajasthan Election Voting : राजस्थानमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद! 'प्रथा बदलणार, काँग्रेसचं सरकार येणार', गेहलोत यांचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com