Railway Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कुठे अन् कसा? वाचा वेळपत्रक...

Mumbai Local Train Mega Block: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
Big Update For Mumbaikars megablock all three local train route on sunday
Big Update For Mumbaikars megablock all three local train route on sundaySaam TV
Published On

Mumbai Local Train Mega Block

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान, लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Big Update For Mumbaikars megablock all three local train route on sunday
World Most Popular Leader: पंतप्रधान मोदींचा जगभरात डंका, ठरले सर्वात लोकप्रिय नेते; दुसऱ्या क्रमांकावर कोण?

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

याशिवाय कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

कुर्ला ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक

मुंबई सेंट्रल ते माहीम अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते चर्चगेट स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. काही लोकल गाड्या ब्लॉक दरम्यान रद्द असणार आहे.

Big Update For Mumbaikars megablock all three local train route on sunday
Team India: हार्दिक पंड्याचा पत्ता कट? रोहित पुन्हा बनणार टी-२० संघाचा कर्णधार; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com