Farmers Bharat Bandh Saam Tv
देश विदेश

Farmers Bharat Bandh: शेतकऱ्यांचा भारत बंद! काय सुरू राहणार, काय बंद होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Farmers Protest News: आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे.

Satish Kengar

Farmers Bharat Bandh:

आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीत जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक शेतकरी हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. आज पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे.

यातच शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चा आणि अनेक कामगार संघटनांनी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. एमएसपीवरील (MSP) हमीभावाच्या मागणीबाबत शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने इतर सर्व शेतकरी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा भारत बंद सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या काळात ग्रामीण भागात वाहतूक, शेतीची कामे, मनरेगा अंतर्गत कामे, खासगी कार्यालये, गावातील दुकाने बंद राहतील, असे शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे.  (Latest Marathi News)

याशिवाय ग्रामीण भागातील औद्योगिक उपक्रमही बंद राहणार आहेत. मात्र या ग्रामीण भारत बंदमुळे रुग्णवाहिका, वृत्तपत्र वितरण, विवाहसोहळे, वैद्यकीय दुकाने आणि परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना थांबवले जाणार नाही, असंही शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे.

एमएसपीवरील हमीशिवाय शेतकऱ्यांना आणखी काय आहेत मागण्या?

शेतकरी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एमएसपीवर पीक खरेदीसाठी कायदेशीर हमी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी. पीक विम्याची चांगली योजना आणावी आणि शेतकऱ्यांना दरमहा 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन देण्यात यावी. दरम्यान, 24 पिकांवरील एमएसपी आधीच दुप्पट वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र संपूर्ण पीक खरेदी करण्याची हमी देता येत नाही. याचा बाजारावर वाईट परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT