Sonia Gandhi Letter: गांधी कुटुंबियांची उत्तर प्रदेशातून एक्झिट; रायबरेलीतील जनतेसाठी सोनिया गांधींच भावनिक पत्र

Sonia Gandhi Letter: काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या रायबरेली लोकसभा मतदासंघातील जनतेसाठी भावनिक पत्र लिहले आहे.
Sonia Gandhi
Sonia Gandhi saam tv

Sonia Gandhi Wrote letter For Raebareli People:

काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या रायबरेली लोकसभा मतदासंघातील जनतेसाठी भावनिक पत्र लिहले आहे. सोनिया गांधी यांनी जयपूरला जाऊन राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सोनिया गांधी लोकसभा मतदारसंघ सोडण्याची चर्चा सुरु होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी रायबरेलीच्या लोकांसाठी पत्र लिहले आहे.

सोनिया गांधी यांनी वाढते वय आणि आरोग्याचे कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळेच त्यांनी रायबरेलीच्या लोकांना पत्राच्या माध्यमातून आवाहन केले आहे. सोनिया गांधी यांनी माझ्या कुटुंबाची काळजी असं भावनिक आवाहन केलं आहे. मी जे काही आहे ते रायबरेलीच्या लोकांमुळेच आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. (Latest News)

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, 'दिल्लीतील माझे कुटुंब अपूर्ण आहे. रायबरेलीला येऊन येथील लोकांमुळे माझे कुटुंब पूर्ण झाले आहे. माझं रायबरेलीशी जुने नाते आहे. माझ्या सासरच्या व्यक्तींकडून मला हे सौभाग्य मिळाले आहे. रायबरेलीशी माझ्या संपूर्ण कुटुंबाचा खूप जास्त जवळचा संबंध आहे.

स्वातंत्र्यानंतर लोकसभा निवडणुकीत माझे सासरे फिरोजशहा येथूनच विजयी होऊन दिल्लीला गेले होते. त्यानंतर तुम्ही माझ्या सासू इंदिरा गांधी यांनादेखील खूप प्रेम दिले. तेव्हापासून आमचा विश्वास अधिक दृढ झाला. माझ्या सासू आणि पती यांना गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आली होती. तेव्हा तुम्ही मला स्वीकारले, असं म्हणत सोनिया गांधी यांनी रायबरेलीतील जनतेचे आभार मानले.

Sonia Gandhi
Crime News: भर लग्नमंडपामध्ये नवरदेवावर गोळीबार, पाहुण्यांच्या किंकाळ्या आणि पळापळ; नेमकं काय घडलं?

मागील दोन निवडणुकांमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे, हे सांगायला मला अभिमान वाटतोय. माझे वाढते वय आणि आरोग्यामुळे मी पुढील निवडणूक लढणार नाही. या निर्णयानंतर मला तुमची सेवा करण्याची संधी मिळणार नाही. जसे तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला आतापर्यंत सांभाळलं तसंच यापुढेही सांभळाल, असं आवाहन सोनिया गांधी यांनी रायबरेलीतील जनतेला केलं आहे.

Sonia Gandhi
Kansas Firing News: धक्कादायक! कॅन्सस शहरात अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू,२२ जण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com