Political Explainer: लोकसभा लढवण्याऐवजी सोनिया गांधी राज्यसभेच्या 'सेफ मोड'मध्ये का गेल्या? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Rajya Sabha: सोनिया गांधी यांचा 25 वर्षांचा संसदीय प्रवास आता नवे वळण घेणार आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्याची बातमी आहे. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतल्याचंही बोललं जात आहे.
Political Explainer
Political ExplainerSaam Digital
Published On

Political Explainer

सोनिया गांधी यांचा 25 वर्षांचा संसदीय प्रवास आता नवे वळण घेणार आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्याची बातमी आहे. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतल्याचंही बोललं जात आहे. त्यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या वृत्ताने त्यांच्या रायबरेलीच्या जागेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रियंका गांधी यांना त्यांचे नैसर्गिक उत्तराधिकारी मानले जात आहे. सोनिया गांधींच्या उत्तराधिकारी आणि अमेठी-रायबरेलीच्या जागेवर चर्चा करण्यापूर्वी सोनियांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय का घेतला ते जाणून घेऊया?

1999 मध्ये अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकून काँग्रेस अध्यक्ष म्हणून संसदीय राजकारणाला सुरुवात करणाऱ्या सोनिया गांधी 2004 पासून सातत्याने रायबरेलीच्या खासदार आहेत, मात्र यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत एकमत झाले आहे. सोनिया गांधी हिमाचल किंवा राजस्थानमधून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. राजस्थानमधून निवडणूक लढवण्याची आशा जास्त आहे कारण राजस्थान काँग्रेस कमिटीनेच याची शिफारस केली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे वय आणि खराब प्रकृती. त्यांना रायबरेलीला जाता येत नाही. नुकतेच त्यांनी रायबरेलीच्या कार्यकर्त्यांना संदेश पाठवला होता की, त्यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघात जाता आले नाही, ना तिथल्या लोकांना भेटता आलं. आता पुढेही शक्य नाही. त्यामुळे येथून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढविण्यास त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाही.

Political Explainer
Explainer: MSP म्हणजे नक्की काय? शेतकरी का आहेत भूमिकेवर ठाम? कायदा झाला तर फायदा होणार का? जाणून घ्या

बंगला त्यांच्या नावावर ज्येष्ठतेनुसार दिला जाईल

खरे तर राहुल गांधींना स्वतःला, सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी, म्हणजेच कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवायची नाही. यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाणार नाही, असे राहुल गांधी यांचे मत आहे. जर त्या लोकसभेऐवजी राज्यसभेच्या सदस्य राहिल्या तर 10 जनपथ येथील बंगला त्यांच्या नावावर ज्येष्ठतेनुसार दिला जाईल. त्यामुळे सोनिया गांधींनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, तर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल.

याबाबत गांधी परिवारात सतत चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या राजस्थान काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावावरही पक्षात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनीही पत्रकारांशी बोलताना पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबत निर्णय घेतील, असं सांगितलं आहे.

प्रियंका रायबरेलीतून लढण्याच्या तयारीत

जर सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत नसतील तर प्रियंका वढेरा रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात. यासाठी खुद्द रायबरेलीच्या कार्यकर्त्यांनी हायकमांडकडे शिफारस केली आहे. सोनिया गांधी यांनीही कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, लोकसभा निवडणूक लढवली नाही, तर कुटुंबातील आणखी कोणीतरी सदस्य येथून निवडणूक लढवेल.असे मानले जाते की सोनिया गांधी उघडपणे काहीही बोलल्या नाहीत परंतु त्यांचा संदर्भ फक्त प्रियंका वड्रा यांच्याकडे होता, त्यांना निवडणुकीची तयारी सुरू करण्यास सांगितल्याची माहितीआहे.

Political Explainer
Delhi Politics: दिल्ली लोकसभेसाठी 'आप'चा काँग्रेसला अल्टिमेटम; वेळीच निर्णय द्या नाहीतर..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com