S 400 Sudarshan Chakra X
देश विदेश

Fact Check : पाकिस्तानने भारताची S-400 सुदर्शन चक्र सुरक्षा प्रणाली नष्ट केली? व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्या...

India Pakistan Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून वारंवार भ्याड हल्ले केले जात आहे. याच दरम्यान भारताची S-400 सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानद्वारे करण्यात आला आहे.

Yash Shirke

Ind Vs Pak : पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला. भारताच्या तिन्ही दलांनी मिळून एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने ड्रोन, मिसाइल वापरुन भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन सिंदूरनंतर सलग दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून भ्याड हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांना भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

पाकिस्तानने केलेला एकही हल्ला यशस्वी झालेला नाही. पाकिस्तानच्या मिसाइल्स भारताच्या एस-४०० (सुदर्शन चक्र) या सुरक्षा प्रणालीने निष्क्रिय केली आहेत. रशियन बनावटीचे एस-४०० सुदर्शन चक्र प्रणालीमुळे भारताला पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडता येत आहे. पण सोशल मीडियावर पाकिस्तानने ही यंत्रणा नष्ट केल्याचे खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. पीआयबी फॅक्ट चेकद्वारे हे मेसेज फेक असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारताची एस-४०० सुदर्शन चक्र ही सुरक्षा प्रणाली पाकिस्तानने उद्ध्वस्त केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. या सर्व पोस्ट खोट्या असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हटले आहे. त्यांच्या फॅक्टचेक अकाउंटवर यासंबंधित एक्स पोस्ट शेअर करण्यात आली आहे. भारतात तणाव निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे. अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला. यात २६ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हवाई हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार सुरु केला. रात्रीच्या वेळेस ड्रोन आणि मिसाइल्सने जम्मू, पंजाब अशा सीमेलगतच्या भागांवर भ्याड हल्ले केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

Oral health problems: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतंय? वेळीच व्हा सावध, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण

पुण्यातील भोंदू बाबाला बेदम चोप, खेडच्या महिलेची केली होती फसवणूक, व्हिडिओ आला समोर

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

SCROLL FOR NEXT