पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Manasvi Choudhary

पांढरे कपडे

पांढरे कपडे दिसायला अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश असतात, परंतु त्यांची स्वच्छता राखणे अत्यंत कठिण असते. विशेषतः पांढऱ्या कपड्यांवर पडणारे पिवळे डाग सामान्य धुण्याच्या पद्धतीने लवकर निघत नाहीत. तुमचे पांढरे कपडे दुधासारखे पांढरेशुभ्र आणि चकचकीत दिसण्यासाठी स्मार्ट टिप्स फॉलो करा.

White Cloths Cleaning Tips | yandex

पांढरे कपडे नेहमी वेगळे धुवा

पांढरे कपडे धुताना ते नेहमी इतर रंगीत कपड्यांपासून वेगळे धुवावेत. इतर कपड्यांवरील रंग पांढऱ्या कपड्यांना सहज लागू शकतो, ज्यामुळे त्यांची मूळ चमक लवकर कमी होते.

Wash Separately | yandex

लिंबू, मीठ आणि बेकिंग सोडा पेस्टचा वापर ( )

पांढऱ्या कपड्यांवरील हट्टी पिवळे डाग काढण्यासाठी लिंबू, मीठ आणि बेकिंग सोडा यांची दाट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग पडलेल्या भागावर लावा आणि थोडा वेळ सुकू द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे धुवा, पिवळे डाग सहज निघून जातील.

Magic Paste | Yandex

चमक टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर

वारंवार धुण्यामुळे पांढऱ्या कपड्यांचा पांढरेपणा कमी होऊन ते पिवळसर दिसू लागतात. हे टाळण्यासाठी कपडे शेवटच्या वेळी धुण्याच्या पाण्यात थोडे व्हिनेगर मिक्स करा आणि त्यात १० मिनिटे कपडे भिजत घाला. यामुळे कपड्यांची चमक कायम टिकते.

Use Vinegar for Brightness

शर्टच्या कॉलरसाठी ब्रशचा वापर

पांढऱ्या शर्टची कॉलर सर्वात लवकर घाण होते. ती नीट स्वच्छ करण्यासाठी फक्त साबण लावण्यापेक्षा, कॉलरवर डिटर्जंट लावून मऊ ब्रशने हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे घाण साचून राहणार नाही.

Cleaning Shirt Collars

रंगाचे डाग काढण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड

जर पांढऱ्या कपड्यावर चुकून दुसऱ्या रंगाचे डाग पडले असतील, तर सामान्य साबणाऐवजी कपडे हायड्रोजन पेरॉक्साइड मिक्स केलेल्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा. यामुळे रंग लवकर आणि सहज निघून येतो.

Hydrogen Peroxide Trick | GOOGLE

NEXT: महिलांसाठी खास छोट्या आणि मोठ्या वाट्यांचे मंगळसूत्र; लेटेस्ट ५ ट्रेंडी पॅटर्न

येथे क्लिक करा..