Manasvi Choudhary
मंगळसूत्र हा विवाहित महिलेचा महत्वाचा दागिना आहे. महिलांच्या मंगळसूत्रामध्ये सध्या अनेक नवीन डिझाईन्स आहेत.
पारंपारिक लूकपासून ते मॉडर्न लूकपर्यंत वाट्यांच्या मंगळसूत्रांची फॅशन कधीच जुनी होत नाही. महिलांसाठी छोट्या आणि मोठ्या वाट्यांच्या डिझाईनमध्ये लेटेस्ट पॅटर्न्स कोणते आहेत ते जाणून घ्या.
सध्याच्या फॅशनमध्ये मोठ्या आकाराची एकच वाटी असलेले मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहे. हे डिझाईन साध्या आणि सोबर साड्यांवर उठून दिसते.
जर तुम्हाला थोडा पार्टीवेअर किंवा ग्लॅमरस लूक हवा असेल, तर वाट्यांच्या कडेने बारीक डायमंड्स किंवा स्टोन असलेले मंगळसूत्र निवडा.
पारंपरिक लूकसाठी टेम्पल डिझाईनच्या वाट्या असलेले मंगळसूत्र महिलामध्ये लोकप्रिय आहे.
आजकालच्या वर्किंग वुमन्ससाठी हलकेफुलके आणि मिनिमलिस्ट डिझाईन्स खूप आवडतात. यामध्ये गोल वाट्यांऐवजी थोडे चौकोनी किंवा आधुनिक आकाराचे वाट्यांचे मंगळसूत्र ट्रेडिंगमध्ये आहेत.