Petrol -Diesel  Saam Tv
देश विदेश

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

Petrol Diesel: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. पण, खरंच देशातला इंधनसाठा संपलाय का? हे आपण जाणून घेणार आहोत...

Priya More
  • भारतात फक्त २ दिवसांचा पेट्रोल साठा

  • पेट्रोल संपणार या व्हायरल मेसेजची सत्यता काय?

  • भारतातील इंधन संकटाबाबत सरकारचं स्पष्टीकरण

  • पेट्रोल पंपांवरील गर्दीमागचं खरं कारण आलं समोर

संदीप चव्हाण, साम टीव्ही

सध्या दावा करण्यात आलाय की 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार. पण, खरंच देशातला इंधनसाठा संपलाय का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

...फक्त 2 दिवस पुरेल एवढाच देशात पेट्रोलचा साठा असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच पेट्रोलसाठा संपत चाललाय का? कारण, अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागलेयत. तर काही पेट्रोल पंपांवर गर्दी होतेय. त्यामुळे आता खरंच पेट्रोलसाठा संपत चाललाय का? फक्त 2 दिवस पुरेल इतकाच साठा आहे का? असा सवाल विचारला जातोय. इंधनाची टंचाई झाली तर सगळ्यांनाच फटका बसेल. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

देशाकडे फक्त 48 तास, म्हणजेच 2 दिवसांचा इंधनसाठा शिल्लक आहे. इंधनसाठा असल्याने पेट्रोल पंपांवरील मोठ्या गर्दी होतेय अशा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेट्रोलचा साठा कमी असल्याने लोक गर्दी करतायत असा दावा केलाय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, साठा असतानाही जर गर्दी केली तर सगळ्यांनाच पेट्रोल मिळणार नाही. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने सध्या देशात किती इंधनसाठा आहे? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. याबाबत आम्ही पडताळणी केली असता सरकारनेच याबद्दल माहिती दिली.

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते आपण पाहणार आहोत. तर भारताकडे अतिरिक्त 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आहे. 2 दिवसांचाच इंधन साठा असल्याचा दावा खोटा आहे. पुरेसा इंधन साठा असल्याची माहिती सरकारने दिली. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सरकारने केलंय. पीआयबीने अशा बातम्या पाहून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केलंय...सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधन नाहीये. त्यामुळे असे मेसेज व्हायरल केले जातायत. मात्र, आमच्या पडताळणीत 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT