

रोहित कदम, साम प्रतिनिधी
राज्यात इंधन टंचाईमुळे राज्यात नवं संकट उभं ठाकलंय.आधीच इंधनांचे भाव वाढलेले असतानाच आता इंधन तुटवड्याचाही सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. पेट्रोल पंपावरील इंधन तुटवड्यामुळे हिंगोलतल्या शेतकऱ्यांची काय अवस्था झालीय पाहा, अशी परिस्थिती इतरही जिल्ह्यांमध्ये आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांत इंधन तुटवड्यामुळे काय परिस्थिती निर्माण झालीये पाहूयात.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे डिझेल भरण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. वाशिममध्येही अकोला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वादातून तुफान हाणामारी झाली.
हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईच्या संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडला. जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झालीय.अनेक पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक लागले.
परभणी जिल्ह्यातही ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले. दुसरीकडे नंदुरबारच्या धडगावमध्ये इंधन संपणार अशा अफवेने मोठा गोंधळ निर्माण झाला.
इंधन मिळावं म्हणून हिंगोलीत एका शेतकऱ्यानं पेट्रोल पंपमालकाचे अक्षऱशः पाय धरलेत. ((आपल्याकडे व्हिज्युअल्स आहेत)) इंधन तुटवड्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय.
शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप कंपन्यांच्या झोनल अधिकाऱ्यांची बैठक बोलावत कडक कारवाईचा इशारा दिलाय. सध्या मशागतीचे दिवस असूनही ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय.
आणि त्यातूनच वाद निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंग घडतायत. तर दुसरीकडे, पेट्रोल-डिझेल महागल्यानं 'गिग वर्कर्स युनियन'ने प्रति-किलोमीटर 20 रुपयांची वाढ करण्याची मागणी केलीये. एकीकडे महागाईचे चटके सामान्य जनतेला जाणवू लागले असतानाच दुसरीकडे इंधन तुटवड्यामुळे सामान्य जनता दुहेरी संकटात सापडलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.