Uttarakhand Tunnel Saam Tv
देश विदेश

EXPLAINER Uttarakhand Tunnel : ४१ मजुरांनी उत्तरकाशी बोगद्यात तब्बल ४०० तासापेक्षा जास्त वेळ कसा घालवला? बचावकार्यात काय आल्या अडचणी?

Uttarkashi Tunnel : नोव्हेंबर १२ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास उत्तरकाशीमध्ये बांधण्यात येत असलेल्या सिल्कयारा-दांदलगाव बोगद्याचा काही भाग कोसळला. दिवाळीपासून साधरण १७ दिवसांपासून हे मजूर बोगद्यात अडकले होते. या १७ दिवसांमध्ये मजुरांचा दिवस कसा जात होता, हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

Uttarkashi Tunnel 41 Laborers Rescue:

उत्तराखंडच्या सिल्कियाराच्या बोगद्यात ४१ मजुरांनी जवळपास ४०० तासपेक्षा जास्त वेळ घालवला. दिवाळीपासून साधरण १७ दिवसांपासून हे मजूर बोगद्यात अडकले होते. परंतु मजुरांनी बाहेर पडण्याची आशा कधी मरू दिली नाही. त्याची इच्छाशक्ती प्रबळ होती आणि त्याचाच परिणाम म्हणून ते आज मोकळा श्वास घेत आहेत.(Latest News)

नोव्हेंबर १२ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास उत्तरकाशीमध्ये बांधण्यात येत असलेल्या सिल्कयारा-दांदलगाव बोगद्याचा काही भाग कोसळला. सुमारे ६० मीटरपर्यंतचा भाग कोसळला होता. यामुळे बोगद्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. बोगद्यातील पाणी काढण्यासाठी टाकलेल्या पाईपमधून ऑक्सिजन, औषध, अन्न आणि पाणी आत पाठवले जाऊ लागले. बचाव कार्यात एनडीआरएफ, आयटीबीपी आणि बीआरओ तैनात करण्यात आले होते.

३२ हॉर्स पावरच्या औगर मशीनने १५ मीटरपर्यंतचा मलबा काढण्यात आला. ड्रिलिंग करत मजुरांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येत होते. नोव्हेंबर १७ तारखेला दुपारी १२ वाजता ऑजर मशीनच्या मार्गात दगड आल्याने ड्रिलिंग थांबण्यात आलं होतं. पूर्ण दिवसभर ड्रिलिंग थांबवण्यात आलं होतं, अशी अनेक समस्या मजुरांना बाहेर काढता आल्या. या १७ दिवसांमध्ये मजुरांचा दिवस कसा जात होता, हे जाणून घेऊ.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४१ मजुरांनी बोगद्यात ४०० तास कसे घालवले. बचाव कार्यात काय अडचणी आल्या. वारंवार बचाव कार्यात अडथळे आल्यानंतरही त्यांनी कशाप्रकारे आपली आशा मरू दिलं नाही हे जाणून घेऊ.

मजुरांनी इच्छाशक्ती मजबूत केली

बोगद्यात अडकल्यानंतर कामगारांसमोर फक्त अंधार होता. त्यांना काहीच दिसत नव्हते. दिवससंपेर्यंत बचावकार्य सुरू झाले होते. तर बाहेर येण्यासाठी बोगद्यात अडकलेल्या कामगारांची धडपड सुरू झाली. बोगद्यातून बाहेर निघण्याचं मार्ग शोधण्यास बराच वेळ लागेल हे मजुरांना समजले. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजुरांनी इच्छाशक्ती बळकट केली आणि वेळ घालवण्याचे मार्ग शोधले. त्यांनी बोगद्याच्या आत मनोरंजनाचे साधने शोधून शोधली.

बोगद्यात बनवले मैदान

मजुरांनी बोगद्यात वेळ घालवण्यासाठी 'चोर-पोलीस'पासून ते तीन पत्ती आणि रमीपर्यंतच्या खेळले. त्यानंतर मजुरांनी हळूहळू बोगदा त्यांच्यासाठी खेळाचे मैदान बनले. ते बोगद्यातून बाहेर येण्यास उत्सुक होते पण त्यांनी धीर सोडला नाही. मजुरांनी आपली आशा सोडली नाही. उत्साह कायम राहण्यासाठी ते बोगद्यात नियमित चालत, योगासने, प्रशासनाच्या मदतीने कुटुंबियांशी गप्पा करणे हे ४१ मजुरांसाठी जीवनदायी ठरले. या दिनचर्येने मजुरांनी स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवलं.

गप्पा आणि योगासन

बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्काचे साधन पूर्णपणे तुटलेले नव्हते. ६ इंचाचा पाइप मजुरांसाठी जीवनवाहिनीसारखा ठरला. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचीही पूर्ण काळजी घेण्यात आली. जीवन वाहिनी ठरलेल्या या पाईपद्वारे अधिकाऱ्यांनी मजुरांना मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स दिले. याशिवाय खैनीची खेपही मजुरांना पाठवण्यात आली. तसेच या मजुरांशी मानसोपचारतज्ज्ञ सतत संपर्क करत होते. मनोचिकित्सकांनी मजुरांना योगासने सांगितली. आणि मनोबल टिकवण्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद साधला.

वेळेवर मिळाले औषधं

या पाईपमुळे बोगद्यातील मजुरांपर्यंत अन्न पोहोचवणे सोपं झालं होतं. या पाईपद्वारे मुजुरांना १६ दिवसांत केळी, सफरचंद, डाळी, खिचडी यासह अनेक खाद्यपदार्थ पाठवण्यात आले. तर पाण्यासाठी त्यांनी तेथे उपलब्ध असल्याने त्यांना पाण्याची टंचाई झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT