उत्तरकाशीतील सिलक्यारा निर्माणधीन बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे गेल्या दोन आठवड्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र बचावकार्यात येणाऱ्या अडचणींमुळे प्रशासन अद्याप कामगारांपर्यंत पोहोचू शकलेलं नाही.
मोठ्या ड्रिलिंग मशीनद्वारे बोगदा खोदून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बचाव कर्मचाऱ्यांनी केला. मात्र शुक्रवारी ड्रिलिंग सुरू असताना ऑगर मशिनचा काही भाग अडकल्याने मशीन पूर्णपणे बिघडले. त्यानंतर आता दुसऱ्या पर्यायावर काम सुरू करण्यात आले आहे.
रविवारी बोगद्याच्या वरच्या भागावरून उभ्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे २० मीटर खोदकाम करण्यात आले आहे. व्हर्टिकल ड्रिलिंग हा पाच पर्यायांपैकी एक आहे ज्यावर काही दिवसांपूर्वी काम सुरू करण्यात आले होते.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण ८६ मीटर उभे ड्रिलिंग करण्यात येणार असून त्यासाठी चार दिवस लागतील. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत काहीतरी खूशखबर येईल, अशा आशा व्यक्त केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उभे खोदकाम जोरात सुरू आहे. कोणतीही अडचण आली नाही तर गुरुवारपर्यंत चार दिवसांत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये ७०० मिमी पाईप्स ड्रिल केले जात आहेत आणि 'एस्केप पॅसेज' तयार करण्यासाठी ढिगाऱ्याच्या आत टाकले जात आहेत. यापासून काही अंतरावर ७० मीटरपर्यंत पातळ २०० मिमी व्यासाचे पाईप टाकले जात आहेत.
उत्तरकाशी बोगद्यात अंदाजे ६० मीटर परिसरात ढिगारा पसरला आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि मद्रास सॅपर्सचे इंजिनिअर्सचे पथकही सिलक्यारा येथे पोहोचले आहे. या टीम मॅन्युअर ड्रिलिंगमध्ये मदत करण्यासोबतच ऑगर मशीनला विविध पार्ट्समध्ये कापून वेगळं करत आहेत.
१२ नोव्हेंबर रोजी सिलक्यारा ते बरकोटपर्यंतचा निर्माणाधीन बोगद्याचा ६० मीटर भाग कोसळला होता. यामध्ये काम करणारे ४१ कामगार यामुळे आतमध्ये अडकले आहेत. मजुरांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.. ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL या पाच एजन्सींना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.