देशभरात दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना उत्तराखंडमध्ये येथील उत्तरकाशीमध्ये मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधीन बोगद्याचे काम सुरू असल्याने काही भाग कोसळल्याने ४० मजूर आतमध्ये अडकून पडले आहेत. तब्बल ४८ तासांपासून या मजुरांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाला आहे. या मजुरांना पाईपद्वारे जेवण आणि ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. दुसरीकडे बोगद्याच्या आत साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे मजूरांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मोठा अडथळा येत आहे.
दरम्यान, मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्याठी बचाव पथकाने नवी योजना आखली आहे. बोगद्याच्या बाजूला सुरुंग करून त्यात मोठ्या रुंदीचे एमएस (सौम्य स्टील) पाईप टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे बोगद्याच्या अडकलेल्या भागात आडवे ड्रिलिंग केले जाईल.
या ड्रिलिंगमध्ये पाईप टाकले जाणार आहे. जेणेकरून बोगद्यात अडकलेले कामगार या पाईपद्वारे बाहेर येऊ शकतील. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले, की आगर मशीनद्वारे ९०० मिमी रुंद पाईप टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी बचावपथक युद्धपातळीवर काम करीत आहेत.
यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिल्क्यरा बाजूने निर्माणाधीन बोगद्याचे काम सुरू होते. रविवारी सकाळी या बोगद्यात अनेक मजूर काम करीत होते. मात्र, काम सुरू असताना अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला. यात जवळपास ४० मजूर अडकून पडले. या मजुरांना वाचवण्यासाठी गेल्या ४८ तासांपासून प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी बचावपथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.