धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने तेरणा आणि मांजरा नदीला पूर आलाय. मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झाले. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसलाय. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली. दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्व तलाठी आणि तहसीलदार यांची ऑनलाइन बैठक घेत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मांजरा नदीला आलेल्या पुरात कळंब तालुक्यातील खोंदला येथील एक शेतकरी वाहून गेला त्याचा अजूनही शोध लागला नसल्याची माहिती.
शहराच्या सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील रस्ते जयमल झाले आहेत
विरार पूर्वेकडील विवा मार्ग, नारंगी रोड, एमबी स्टेट, जैन मंदिर रोड, नालासोपारा रोड, प्रगती नगर, बोळींज रोड, वसई फाटा अशा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचला आहे
याच साचलेल्या पाण्यातून नागरिकांना चाकरमान्यांना शाळकरी मुलांना प्रवास करावा लागतो
मात्र पालिकेने बसवलेली यंत्रणा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या शिवना टाकळी धरण 93.49 टक्के भरले आहे. त्यामुळं धरणाचे तीन दरवाजे 20 इंचानी उघडण्यात आले आहे. तीन दरवाजे 2280 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
० पुढील तीन ते चार तासांमध्ये रायगडच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
० हवामान खात्याने वर्तवला अंदाज
० रायगड मधील सर्वच नद्या सामान्य
० जिल्ह्यात सर्वत्र दाट ढगाळ वातावरण
० अधून मधून सुरू आहेत पावसाच्या जोरदार सरी
माऊली जन्मस्थळ आसलेल्या आपेगाव येथे माऊलींचा 750 वा जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे
राज्यभरातुन भाविक माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी करत असून, मंदिर परिसर भाविकांनी फूलून गेला आहे
जन्मोत्सवानिमित्त आपेगाव नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
राधानगरी धरण 100 टक्के भरल्यानं 2 स्वयंचलित दरवाजे उघडले
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि 6 उघडले
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि 6 मधून 2856 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 1500 क्युसेक असा एकूण 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू
नदीकडच्या गावांना दक्षतेचा इशारा
श्रावण महिना,15 ऑगस्ट आणि त्यानंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज समाधी दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लाखो भाविक सध्या शेगावात पर्यटन आणि दर्शनासाठी दाखल झाले असून शेगाव शहरातील सर्व खाजगी हॉटेल्स व लॉज हाऊसफुल झालेले बघायला मिळत आहे इतकच काय तर शेगाव येथील पार्किंग व्यवस्था ही कोलमडली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक पर्यटनासह देशभरातील धार्मिक स्थळांना भेटी देत असतात आणि त्यामुळेच शेगाव येथे ही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे ..
सोलापूर जिल्ह्यात मागच्या 5 ते 6 दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहू लागले
उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे रानमसले - खुनेश्वर पूल गेला पाण्याखाली
रानमसले - खुनेश्वर पुलावरून पाणी ओसंडून लागले वाहू
रानमसले - खुनेश्वर पूल पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट काढत जीव मुठीत धरून नागरिक करतायत प्रवास..
लातूर जिल्ह्यात सर्व दूर पावसाचे हजेरी पाहायला मिळते आहे. काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील, रेणा आणि तावरजा नदीला पूर आलाय, भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर उघडले नसल्याने नदीकाठच्या शेती पिकांमध्ये पाणी शिरल आहे. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल आहे .
नदीला आलेल्या पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले; पावसामुळे काही घर जमीन दोस्त...
पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान वर्षभरासाठी घरात साठवलेल अन्नधान्य कपडे व इतरही वस्तू पावसामुळे भिजल्या...
अजून पर्यंत शासनाची कोणतीही मदत नुकसानग्रस्त नागरिकांना नाही....
नुकसाना नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? स्थानिक नागरिकांना प्रश्न
काल दिवसभरात दोन ते तीन वेळा एक एक तास वाहतूक झाली वाहतूक कोंडी
सिंहगड वाहतूक व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हस्तक्षेप होणे आवश्यक आहे वनविभागाकडुन केवळ वनव्यवस्थापन समितीच्या भरोषावरच गडाचे नियोजन ठेवल्याचा परिणाम पर्यंटनावर होतोय.
दुपारनंतर एक किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर वाहने लावून असंख्य पर्यंटकांना गडावर जावे लागले.
काल 15 ऑगस्ट सुट्टीमुळे अनेक पर्यटकांनी केला गडावर जाऊन आनंद साजरा...
बार्शी तालुक्यातील कोरेगावात 50 हेक्टर शेती नदीच्या प्रवाहात गेले वाहून
बार्शी तालुक्यातील यमाई तलाव झाला ओव्हर फ्लो,त्यामुळे सांडव्यातून सुटलेल्या पाण्याने यमाई नदीचा प्रवाह वाढला
यमाई नदीचा प्रवाह वाढल्याने,नदी काठच्या शेतीत शिरले पाणी
या नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कोरेगावातील 50 हेक्टर शेती सोयाबीन पिकासह गेली वाहून
लातूर जिल्ह्यात सर्वत्र तुफान पाऊस बरसतोय, जिल्ह्यातल्या मांजरा ,रेणा,आणि तेरणा, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला, नदीकाठच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाल आहे, तर निलंगा तालुक्यातील जाजनून येथे वाऱ्यामुळे ऊस शेती आडवी झाली आहे. लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला आहे,तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय.
मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वे लोकल उशिराने धावत आहेत. मानखुर्द स्थानकावर लोकलच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहेत. लोकल थांबल्यामुळे अनेकजण रेल्वे रूळावरून चालत आपला मार्ग काढताना दिसत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काल संध्याकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली. वैभववाडी, कणकवली व कुडाळ या सह्याद्री पट्ट्यातील तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले. वैभववाडी तालुक्यात 155 मिमी एवढा पाऊस कोसळला. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आजही दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
वीस दिवसानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यात जोरदार आगमन केले असून नऊ तासात तब्बल 72 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 28 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली असून रात्रीही अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.पुसद, मारेगांव,बाभुळगांव तसेच यवतमाळ तालुक्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चार तालुक्यांतील एक हजार 779 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला मोठा पूर आलाय.नांदेडच्या लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ते गांधीनगर या गावच्या नदीला देखील मोठा पूर आला आहे. या नदीवर पूल नसल्याने या पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.या नदीच्या पुरातून शेतकरी बैलगाड्यांसह आपला जीव धोक्यात घालून नदी पार करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.धानोरा मक्ता ते गांधीनगर जाण्यासाठी पावसाळ्यात या नदीच्या पाण्यातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय.मागील अनेक वर्षा पासून या नदीवर पूल उभारण्याची मागणी असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
अकोला शहरातल्या शिवणी परिसरात उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांच्या चाव्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना देण्यात आल्या. मात्र, घर मिळवण्याच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप खुद्द सरकारमधील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.
सुरुवातीला लाभार्थ्यांना प्रत्येकी घर केवळ 5 लाख 50 हजार रुपयांत मिळेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, चाव्या मिळेपर्यंत हा आकडा नऊ लाख रुपयांपपार गेला असल्याचे अनेकांनी सांगितले. या अचानक वाढलेल्या खर्चामुळे घर घेणाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीये.. दरम्यान, लाभार्थ्यांच्या तक्रारीनुसार, घर बुकिंगच्या वेळी स्वतंत्र शुल्क आकारले गेले, त्यानंतर लाईट फिटिंग, वॉशरूम, व इतर मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र पैसे मागण्यात आले. एवढेच नाही तर, बँकेकडून लोन मंजूर करून देण्यासाठीही काहींनी हजारोंची रक्कम उकळल्या. या प्रक्रियेत काही खासगी एजंट खुलेपणाने फिरत होते, आणि त्यांचा म्हाडाच्या संबंधित काही कर्मचाऱ्यांशी संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. तर काही लाभार्थ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे तक्रारी मांडल्या. मिटकरींनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, परिणामी, ‘म्हाडाचे घर’ ही सर्वसामान्यांसाठी स्वप्नपूर्ती न ठरता ‘लुटीचा अड्डा’ बनल्याची टीका होत आहे
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 16 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी 'अत्यंत जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.