Uttarkashi Tunnel Rescue Operation : 'हा भावनिक करणारा क्षण'; सर्व ४१ मजूर सुरक्षित बाहेर आल्यानंतर PM मोदींनी व्यक्त केला आनंद

Uttarkashi Tunnel Rescue : सर्व ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केलाय.
uttarakhand tunnel
uttarakhand tunnelANI
Published On

Uttarkashi Tunnel Rescue Operation :

गेल्या १७ दिवसांपासून उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांनी आज सुटकेचा श्वास घेतला. सर्व ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी चिन्यालीसौर सार्वजनिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले आहे. (Latest News)

चारधाम ऑल वेदर प्रोजेक्टच्या सिल्क्यरा बोगद्याचं काम चालू असताना बोगद्यात दरड कोसळली त्यामुळे ४१ मजूर अडकले होते. त्यांना आज सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. सर्व मजूर सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत बचाव पथकाचं कौतुक केलं आहे. तर मजुरांच्या धैर्याचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्कियारा बोगदा ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या बचाव कार्य करणाऱ्या लोकांच्या शौर्याचे आणि निर्धाराचे कौतुक केलं. गेल्या १६ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना त्यांनी नवसंजीवनी दिली. या बचाव मोहिमेने "मानवता आणि टीमवर्कचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

मजुरांना बाहेर काढल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांनी त्यांची भेट घेतली. १६ दिवसांपासून सुरू असलेल्या बचाव कार्य करणाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर, बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यात आली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी सिल्क्यरा बोगद्याच्या बाहेर मिठाईचे वाटप केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचाव कार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारं आहे. जे मजूर बांधव बोगद्यात अडकले होते त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य लाभो. बोगद्यात अडकलेले मजूर हे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या कुटुंबियांना भेटणार आहेत. ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात बांधवांच्या कुटुंबियांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक शब्दात करणं शक्य नाही. या बचाव कार्यात जुटलेल्या सर्व लोकांच्या जिद्दीला मी सलाम करतो.

काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्विट केले. "उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांची सुटका करण्यात आल्याचे ऐकून मला दिलासा आणि आनंद झाला. बचाव कार्य करणाऱ्यांना १७ दिवसांत अनेक अडथळे आले.

यात त्यांनी मानवी सहनशक्तीचा पुरावा दाखवलाय. देश त्यांच्या जिद्दीला सलाम करतोय. त्यांच्या घरापासून दूर, अत्यंत वैयक्तिक जोखमीवरही, गंभीर पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. मी बचाव टीमचे आणि सर्व तज्ञांचे अभिनंदन करते. इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहिमेपैकी एक असलेल्या मोहिमेत त्यांनी अविश्वसनीय धैर्याने आणि दृढनिश्चयाने काम केले आहे." असं ट्विट राष्ट्रपती मुर्मू यांनी केलंय.

uttarakhand tunnel
Uttarakhand Tunnel Rescue: ब्रेकिंग! १७ दिवसानंतर सुटकेचा नि:श्वास; उत्तरकाशी बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यात यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com