Deve Gowda Saam Tv
देश विदेश

Electoral bonds: माजी पंतप्रधानांच्या पक्षाला कोणी दिली सर्वाधिक देणगी, पक्षाने स्वतःच केली माहिती जाहीर

JDS News: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसला इन्फोसिस, बायोकॉन, एम्बेसी ग्रुप आणि जेएसडब्ल्यू स्टील यांसारख्या कंपन्यांकडून इलेक्टोरल बाँडद्वारे देणग्या मिळाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Electoral bonds News:

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसला इन्फोसिस, बायोकॉन, एम्बेसी ग्रुप आणि जेएसडब्ल्यू स्टील यांसारख्या कंपन्यांकडून इलेक्टोरल बाँडद्वारे देणग्या मिळाल्या आहेत.

जेडीएसला 20 मार्च 2018 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीत पक्षाने दिलेल्या तपशिलांच्या आधारे निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. 17 मार्च रोजी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांकडून इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळालेल्या देणग्यांचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेडीएसला मिळाली 89.75 कोटी रुपयांची देणगी

जेडीएस अशा काही पक्षांपैकी एक आहे ज्यांनी देणगीदारांचे तपशील सार्वजनिक केले आहेत. त्यानुसार पक्षाला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 89.75 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जेडीएसला 20 मार्च 2018 ते 18 एप्रिल 2023 दरम्यान अॅबेसी ग्रुप ऑफ कंपनीजकडून 22 कोटी रुपये मिळाले होते.   (Latest Marathi News)

देवेगौडा यांच्या पक्षाला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या कंपनीबद्दल बोलायचे झाले तर ती आहे मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. या कंपनीने पक्षाला 50 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय जेडीएसला इन्फोसिसकडून 1 कोटी रुपये, किरण मुझुमदार शॉच्या बायोकॉनकडून 2.5 कोटी रुपये आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडकडून 5 कोटी रुपये देणग्या मिळाल्या होत्या.

जेडीएस 10 राजकीय पक्षांपैकी एक आहे ज्यांनी त्यांच्या पक्षाच्या देणगीदारांच्या नावांसह देणगीची रक्कम उघड केली आहे. त्यात आम आदमी पक्ष, द्रमुक, एआयएडीएमके आणि जेडीयू सारख्या इतर पक्षांचाही समावेश आहे.

डीएमकेला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 656.50 कोटी रुपये मिळाले

डीएमकेला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 656.50 कोटी रुपये मिळाले आहेत. या रकमेचा मोठा भाग सँटियागो मार्टिनची लॉटरी विकणारी कंपनी फ्यूचर गेमिंगकडून प्राप्त झाला आहे. याशिवाय डीएमकेला मेघा इंजिनिअरिंगकडून 105 कोटी रुपये, इंडिया सिमेंटकडून 14 कोटी रुपये आणि सन टीव्हीकडून 100 कोटी रुपये मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT