UPSC Prelims Exam 2024: यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरिक्षेच्या तारखेत बदल, या दिवशी होणार परीक्षा; काय आहे कारण?

UPSC Prelims Exam Postponed: लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे (UPSC) घेतली जाणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
UPSC Prelims Exam 2024 Postponed
UPSC Prelims Exam 2024 PostponedSaam Tv

UPSC Prelims Exam Postponed:

लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे (UPSC) घेतली जाणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही परीक्षा आता 26 मे 2026 रोजी होणार होत्या. यूपीएससीने अधिकृत नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे.

नोटीसमध्ये काय लिहिलं आहे?

या नोटीसमध्ये लिहिलं आहे की, ''आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा आता 26 मे 2026 रोजी घेतल्या जाणार होत्या, त्या आता 16 जून रोजी घेतल्या जाणार.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

UPSC Prelims Exam 2024 Postponed
Maharashtra Politics: राज ठाकरे आणि भाजपची सेटिंग सहा महिन्याआधीच झाली होती, विनायक राऊत यांचा दावा

दरम्यान, नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा एकाच वेळेला येत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे. जे 19 एप्रिल 2024 पासून सुरू होईल आणि 1 जून 2024 रोजी संपेल. सर्व टप्प्यातील मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे.  (Latest Marathi News)

नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार IAS, IPS आणि IFS होण्यासाठी परीक्षेसाठी अर्ज करतात. या वर्षी यूपीएससी 2024 अधिसूचना गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

UPSC Prelims Exam 2024 Postponed
Kalyan News: दिव्यातील वादावर पडदा? कल्याणमधून श्रीकांत शिंदेच असतील उमेदवार; भाजपच्या बैठकीत काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

यूपीएससी सीएसई परीक्षा केंद्र 2024 नुसार, पूर्व परीक्षा 80 परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे एकूण 1,056 रिक्त जागा भरल्या जातील. त्यापैकी 40 रिक्त पदे PwPD श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com