Maharashtra Politics: राज ठाकरे आणि भाजपची सेटिंग सहा महिन्याआधीच झाली होती, विनायक राऊत यांचा दावा

Vinayak Raut: 'राज ठाकरे आणि भाजपची सेटिंग होणार हे सहा महीन्या पूर्वीच स्पष्ट झालं होतं. आपल्या पक्षातील उमेदवारांपेक्षा त्यांची ज्यांच्याशी सेटींग झाली आहे: विनायक राऊत
Vinayak Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting
Vinayak Raut On Raj Thackeray Amit Shah MeetingSaam Tv
Published On

>> विनायक वंजारे

Vinayak Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting:

''राज ठाकरे आणि भाजपची सेटिंग होणार हे सहा महीन्या पूर्वीच स्पष्ट झालं होतं. आपल्या पक्षातील उमेदवारांपेक्षा त्यांची ज्यांच्याशी सेटींग झाली आहे. त्यांना निवडून कसं आणता येईल, हे आजपर्यंत राज ठाकरेंनी केलं. म्हणून आज मनसेची बिना लोकप्रतिनिधी अशी अवस्था झाली आहे'', असं ठाकरे गटाचे विनायक राऊत म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

'मी अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येईन'

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबात भाष्य करताना ते म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सहकार्यातून या निवडणुकीत आघाडीचा उमेदवार म्हणून मी अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येईन. विरोधी पक्षाला उमेदवारच मिळत नाही, कारण माझ्यासमोर निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे ते धाडस करत नाहीत. म्हणून हे ताटकळत राहील आहे.'' माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vinayak Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting
Kalyan News: दिव्यातील वादावर पडदा? कल्याणमधून श्रीकांत शिंदेच असतील उमेदवार; भाजपच्या बैठकीत काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

महाविकास आघाडीने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, ''महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना चार जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्या चारही जागांवर वंचितचे खासदार निवडून येतील, अशा जागा सोडल्या आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव चांगला आहे, असं त्यांच्याही कार्यकर्त्यांचे मत आहे. तो प्रस्ताव आंबेडकर यांनी स्विकारावा आणि मोदी विरोधातील लाटेमध्ये अग्रणी राहाव अशी विनंती आहे.'' (Latest Marathi News)

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या तिढ्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''कोल्हापूर ही शिवसेनेची पारंपरिक जागा आम्ही शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडली. आमची कमी होणारी जागा पर्याय म्हणून आम्हाला सांगली द्या, म्हटलं तर त्यात वावगं काय? त्यामुळे काँग्रेसने ती आम्हाला मोठ्या मनाने दिली पाहीजे. महाविकास आघाडीसोबत येणाऱ्या राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले सोडा सुद्धा म्हणत आहे, मग शिवसेनेसाठी सांगली मिळनं क्रमप्राप्त आहे.''

Vinayak Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting
Pradeep Sharma: लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी, न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

नितेश राणे यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, ''नितेश राणेंना आता किंमत देण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांची सेवाचाकरी करायची आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची, या पलिकडे नितेश राणेंचे कर्तृत्व काय हे त्यांनी दाखवावं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com