Pradeep Sharma: लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी, न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Lakhan Bhaiya Encounter Case : लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Pradeep Sharma
Pradeep SharmaSaam Tv
Published On

Lakhan Bhaiya Encounter :

लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यात सरेंडर होण्याचे आदेश दिले आहेत.

कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा 2006 मध्ये बनावट एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर होता. याच प्रकरणी न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. जो आज जाहीर करण्यात आला असून शर्मा यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. याप्रकरणी 16 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pradeep Sharma
Loksabha Election 2024: अखेर माढ्याचा तिढा सुटला! देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी; रामराजेंचा विरोध मावळला?

काय आहे प्रकरण?

मिळाल्या माहितीनुसार, लखनभैय्या याच्याविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होतो. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखनभैय्याचा वर्सोवा येथे एन्काऊंटर झाला.  (Latest Marathi News)

या कथित एन्काऊंटरचे नेतृत्व प्रदीप शर्मा यांनी केले होते. 2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती.

Pradeep Sharma
NCP Crisis: 'घड्याळा'मुळे गोंधळ; अजित पवार गटाला नवे चिन्ह द्या.. शरद पवार गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

तसेच लखनभैय्याचा भाऊ राम प्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात याचिका दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवण्याआधी राम प्रसाद गुप्ता यांनी 2013 मधील ही याचिका मागे घेतली. ज्यामध्ये त्यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात राज्य सरकारनेही याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेच्या विरोधात युक्तिवाद केला होता.

याचिकाकर्ते राम प्रसाद गुप्ता यांच्या वतीने वकील युग मोहित चौधरी यांनी युक्तिवाद केला. 2006 मध्ये लखनभैय्याचा एन्काउंटर हा सुनियोजित कट होता, असे या दोघांनी न्यायालयासमोर सांगितले. हा एन्काउंटर बनावट होता आणि तो लपवण्यासाठी पोलिसांनी खोटे पुरावे तयार केले होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या एन्काऊंटरमध्ये 12 पोलीस सामील होते.

तर याप्रकरणी सुनावणीदरम्यान, 12 पैकी 7 जणांनी असा युक्तिवाद केला की, ते कधीही या एन्काउंटर टीमचा भाग नव्हते. लखनभैय्याचा भाऊ राम प्रसाद गुप्ता यांनीही सांगितले की, बॅलिस्टिक अहवाल आणि कॉल डेटा रेकॉर्डवरून असे दिसून येते की प्रदीप शर्मा एन्काउंटरच्या ठिकाणी उपस्थित होते आणि लखनभैय्याला संपवण्याचा मुख्य कट त्याच्याकडूनच रचला गेला होता. दरम्यान, न्यायालयाने आज प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com