एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Political News : एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बड्या महिला नेत्या नाराज असल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam tv
Published On

एकनाथ शिंदे यांना पु्न्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिंदे गटाच्या महिला नेत्या शायना एनसी नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटावरील नाराजीनंतर शायना एनसी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. शायना एनसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो.

विधानपरिषदेची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मोक्याच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी दिली. विधानपरिषदेत उमेदवारी न मिळाल्याने शायना एनसी नाराज झाल्याची चर्चा आहे. शायना एनसी यांनी गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

शायना एनसी या मूळच्या भाजपच्या सक्रिय नेत्या होत्या. दोन वर्षांपू्र्वी विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाने विश्वास दाखवून त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात तिकीट दिलं होतं. परंतु शायना एन. सी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिंदे गटाकडून विधानपरिषदेत उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांना होती. मोक्याच्या क्षणी निवडणुकीत उमेदवारी डावलली गेली. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. पक्षात दुर्लक्षित झाल्याच्या भावना निर्माण झाल्याने नवीन पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शायना एनसी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास शिंदे गटासाठी मोठा संघटनात्मक धक्का असेल, अशी चर्चा आहे.

Eknath Shinde
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसणार; बडा नेता साथ सोडणार?

शायना एन. सी. यांच्यावर ठाकरे गटाची टीका

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी म्हटलं की, 'निवडणुकीच्या काळात भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या पण निवडणुकीत पराभव झालेल्या आणि शिंदे गटाकडून राज्यसभा आणि विधानपरिषदेला डावललेल्या शायना एनसी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत म्हणे? आणि त्या पक्षाकडून महिला आयोगावर जाणार आहेत म्हणे? खरं आहे का शायनाताई?'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com