

विधानसपरिषदेच्या उमेदावारीनंतर राष्ट्रवादीत नाराजीचा विस्फोट
आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा
आनंद परांजपे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षात नाराजीचा भडका उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या एका जागेवर ७० हून अधिक जण इच्छुक होते. परंतु शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. झिशान यांच्या उमेदवारीवरून काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काल बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या ९० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यानंतर आता ठाण्याचे आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आनंद परांजपे इच्छुक होते. परंतु झिशान यांच्या नावाची घोषणा होताच परांजपे नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे-आनंद परांजपे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. परंतु ही भेट खासगी कामानिमित्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या परांजपे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे. बच्चू कडू यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर परांजपे यांनी शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. उमेदवारीसाठी विश्वासात घेण्यात आलं नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. सहा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पुन्हा संधी न मिळाल्याने अमोल मिटकरींनी माध्यमांशी बोलताना खंत बोलून दाखवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.