अमोल मिटकरींचा पत्ता कट, सुनेत्रा पवारांनी दिली या नेत्याला आमदारकी, नेमकं गणित काय?

Zeeshan Siddiqui NCP : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Zeeshan Siddique
Zeeshan Siddique
Published On

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमदेवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत झिशान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. अमोल मिटकरी यांना पुन्हा संंधी देण्यात आलेली नाही. झिशान सिद्धीकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. विधान परिषदेच्या १० जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. त्यामधील एक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. त्या जागेवर अमोल मिटकरी यांच्याऐवजी झिशान सिद्दकी यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपने विधान परिषदेसाठी आपल्या ६ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सावंत यांच्या नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचं नाव समोर आले आहे.

Zeeshan Siddique
Bachchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; अधिकृत घोषणा

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने निवडणुकीत ट्विस्ट आलाय. कारण, काँग्रेसकडूनही निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी उमेदवारीसाठी अनेक नावांवर चर्चा सुरू होती. पण त्यावर झिशान बाबा सिद्दीकी यांचे नाव निश्चित झाले आहे.

Zeeshan Siddique
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणीनंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर केला जाईल. विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने, सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांसंदर्भातील रणनीती अधिक तीव्र केली आहे. सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार, या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला सहा, शिवसेनेला (शिंदे गट) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com