Prakash Ambedkar: 'वंचितला बदनाम करणे योग्य नाही', प्रकाश आंबेडकर यांचा रोख कोणाकडे

Vanchit Bahujan Aghadi News: ''महाविकास आघाडीत भांडण आहे. त्यांच्यात जागावाटप होत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करणे योग्य नाही,'' असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Saam TV
Published On

Lok Sabha Election 2024:

''महाविकास आघाडीत भांडण आहे. त्यांच्यात जागावाटप होत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करणे योग्य नाही,'' असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीकडून ज्या जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यातील 7 जागांची आम्हाला माहिती द्यावी. आम्ही काँग्रेसला तिथे पूर्णपणे पाठिंबा द्यायला तयार आहोत.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar
TMC Commissioner Transfer: मोठी बातमी! ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बंगार यांची BMC अतिरिक्त आयुक्तपदी बदली

ते म्हणाले आहात आहेत की, ''काँग्रेस पक्षाकडे आम्ही कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. आम्ही केवळ एवढेच म्हणालो आहोत की, त्या तुमच्या 7 जागांबाबत माहिती द्या. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. आमच्या सोबत त्यांचा कोणताही संवाद झाला नाही. मात्र आम्ही आशा करतो की, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने या प्रस्तावावर त्यांचा काय विचार आहे ते कळवावे.''  (Latest Marathi News)

...म्हणून त्यांनी त्या 7 जागांची माहिती द्यावी

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''महाविकास आघाडीत 10 जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच आहे. 5 जागांवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच आहे. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने अशी भूमिका घेतली आहे की, महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी आम्हाला 7 जागांची माहिती द्यावी. तिथे त्यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल.''

Prakash Ambedkar
UPSC Prelims Exam 2024: यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरिक्षेच्या तारखेत बदल, या दिवशी होणार परीक्षा; काय आहे कारण?

महाविकास आघाडीसोबतच्या युतीसाठी आमचे दरवाजे शेवटपर्यंत उघडे आहेत, असं आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले आहेत की, ''भाजपला हरवण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील, ती पावलं आम्ही उचलणार आहोत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com