TMC Commissioner Transfer: मोठी बातमी! ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बंगार यांची BMC अतिरिक्त आयुक्तपदी बदली

BMC News: एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या पालिकांच्या उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.
Abhijit Bangar
Abhijit Bangar Saam Tv

Thane Municipal Commissioner Transfer :

एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या पालिकांच्या उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यातच ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बंगार यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

अभिजीत बंगार यांची पी. वेलरासू यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. अभिजीत बंगार यांना त्वरित पदाचा कार्य कार्यभार स्वीकारण्याचे शासनाकडून देण्यात आले आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Abhijit Bangar
UPSC Prelims Exam 2024: यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरिक्षेच्या तारखेत बदल, या दिवशी होणार परीक्षा; काय आहे कारण?

बीएमसी आयुक्तपदी तीन नावांची चर्चा

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिले होते. यानंतर आता बीएमसी आयुक्तपद रिक्त आहे. राज्य सरकारने मुंबई पालिका आयुक्त म्हणून तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने आयएएस अधिकारी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी यांचं नाव पाठवलं आहे. या तिघांपैकी एकाची वर्णी मुंबई पालिका आयुक्त म्हणून लागू शकते, अशी शक्यात वर्तवली जात आहे.

Abhijit Bangar
Maharashtra Politics: राज ठाकरे आणि भाजपची सेटिंग सहा महिन्याआधीच झाली होती, विनायक राऊत यांचा दावा

दरम्यान, सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्यासाठी अनेक राज्यांमधील वरिष्ठ ब्युरोक्रॅट्सच्या बदलीचे आदेश दिलेत. सहा राज्यातील गृह सचिवांच्या बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. या राज्यांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्याचा समावेश आहे. यासह पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांनाही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com