Datia Bypoll Result Sam Tv
देश विदेश

Datia Bypoll Result: डाव टाकला, पण फसला! भाजपला तगडा झटका; काँग्रेसच्या उमेदवारानं चारली धूळ, निकाल का फिरला?

Election Result Update: मध्यप्रदेशच्या दातिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा जोरदार पराभव केला. काँग्रेस उमेदवार घनश्याम सिंह विजयी झाले.

Priya More
  • दतिया विधानसभा पोटनिवडणूक निकाल

  • घनश्याम सिंह यांचा भाजपवर विजय

  • काँग्रेसने दतिया पोटनिवडणूक जिंकली

  • भाजप उमेदवाराचा केला पराभव

दातिया विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत सत्ता काबिज केली. या पोटनिवडणुकीतील मतमोजणीच्या सर्व फेऱ्या संपवल्या असून काँग्रेस उमेदवार घनश्याम सिंह विजयी झाले. त्यांचा विजय होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. घनश्याम सिंह यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा पराभव केला.

दातिया विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह ६०६५ मतांच्या फरकांनी विजयी झाले. घनश्याम सिंह यांनी मतमोजणीच्या सुरूवातीच्या फेऱ्यांपासूनचच आघाडी कायम ठेवली. या पोटनिवडणुकीत घनश्याम सिंह यांचा विजय होताच सर्वांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीमध्ये आपला विजय होणार यावर काँग्रेस उमदेवाराला विश्वास होता.

या निवडणुकीच्या निकालाचा मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने कोणताही परिणाम होणार नाही. पण येथील पराभवामुळे भाजपची चिंता वाढू शकते. काँग्रेसमधील मतभेद आधीच उघड झाले आहेत. जेव्हा पक्षाने माजी आमदार राजेंद्र भारती यांचे सदस्यत्व रद्द केले तेव्हा त्यांनी विद्यमान उमेदवार घनश्याम सिंह यांच्यावर भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत असल्याचा आरोप केला. त्यांनी असेही म्हटले होते की, ते २०२८ च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवली जाईल.

२०२३ मध्ये राजेंद्र भारती यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दातिया विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता. पण नंतर त्यांना एका जुन्या फसवणूक प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात त्यांना ३ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर दिल्ली कोर्टाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Beach : मुंबईत समुद्रकिनाऱ्याची खरी मजा घ्यायची असेल तर ‘या’ बीचवर एकदा फेरफटका नक्की मारा

Maharashtra News Live Update: अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला जीवदान

Tuesday Horoscope: भरभराट होणार! ५ राशींच्या हातात पैसा खेळता राहील, वाचा उद्याचे राशीभविष्य

काँग्रेसचा सुपडासाफ! ऐतिहासिक विजय नोंदवून भाजपनं राखला १८ वर्षांचा बालेकिल्ला, कोणाला किती मिळाली मते?

मैत्रीत 'या' लोकांना नेहमीच मिळतो धोका; मित्रासाठी जीव द्यायला असतात तयार, तरीही होतो दगाफटका

SCROLL FOR NEXT