समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Indonesia ship missing : इंडोनेशियातील जावा समुद्रात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता झाले आहे. जहाजाचा अचानक संपर्क तुटल्यानंतर बचाव पथकांकडून समुद्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
Indonesia ship missing
Indonesia ship missing
Published On

Indonesia ship carrying 240 passengers goes missing in Java Sea : इंडोनेशियातील जावा समुद्रात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक बेपत्ता झाले आहे. जहाजाचा अचानक संपर्क तुटल्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. या जहाजात २४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली. हा अपघात कशामुळे झाला, याबाबतची माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. सध्या स्थानिक बचाव पथकांकडून समुद्रात जहाजाचा वेगाने शोध घेतला जात असून या घटनेमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना घेऊन जणारे हे जहाज पूर्व जावाहून बोर्नियो बेटावरील दक्षिण कालीमंतनकडे जात होते. त्यावेळी अचानक संपर्क तुटला. घटनेनंतर लगेचच स्थानिक बचाव पथकांनी समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.

Indonesia ship missing
Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

तांत्रिक बिघाडामुळे 'व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८' या जहाजाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाल्याचे शोध आणि बचाव कार्यालयाने सांगितले.

जहाज इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या सुराबायाहून बंजारमासिनकडे जात होते. जहाजाच्या ऑपरेटरने अधिकाऱ्यांना सांगितले की, समुद्राच्या हवामानात अचानक बदल झाल्यामुळे जहाजाशी संपर्क तुटला.

प्राथमिक माहितीनुसार, जहाजाचे शेवटचे लोकेशन बंजरमासिनच्या किनाऱ्यापासून १४८ किलोमीटर अंतरावर जावा समुद्रात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शक्य तितक्या लवकर जहाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

Indonesia ship missing
Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

बंजरमासिन बचाव संस्थेचे कार्यप्रमुख अरियांतो अर्दी यांनी जहाजाशी संपर्क तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शोध मोहीम राबवण्यासाठी आम्ही त्रिशक्ती येथे एक ऑपरेशन पोस्ट स्थापन केली आहे. समुद्रात बेपत्ता झालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी बचाव आणि मदत पथके कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com