Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana August installment Date Update : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. १७ सप्टेंबरपासून हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे  ₹१५०० गणेशोत्सवात मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर
Ladki Bahin Yojana Update Saam Tv
Published On

Ladki Bahin Yojana August installment payment date : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाचे आगमन होत असून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. या सण-उत्सवाच्या काळातच राज्यातील पात्र महिलांना राज्य सरकारकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

१ कोटी ६६ लाख महिलांना होणार फायदा

राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. नुकताच ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा सण पार पडला. त्या वेळी सरकारने जुलै महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग केले होते. आता गणेशोत्सवादरम्यान, विशेषतः 'गौरी आगमना'च्या मुहूर्तावर ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा करून महिलांना मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. १७ तारखेपासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात टप्प्या टप्प्याने हप्ता जमा होऊ शकतो.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे  ₹१५०० गणेशोत्सवात मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर
Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

एकत्र ३००० रुपये मिळण्याचीही शक्यता

सध्या तरी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा वक्तव्य आलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, जर २० सप्टेंबरपर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत, तर महिलांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र ३००० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जाऊ शकतात.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे  ₹१५०० गणेशोत्सवात मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर
Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

महिलांचे लक्ष सरकार काय निर्णय घेणार याकडे

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. सणाच्या काळात घरात अनेक छोटे-मोठे खर्च असतात. अशा वेळी १५०० रुपयांची ही मदत महिलांसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. त्यामुळे गौरी आगमनापूर्वी सरकार खात्यात पैसे जमा करून लाडक्या बहिणींना दिलासा देणार की दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देणार, याकडे आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com