Manasvi Choudhary
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि कामाच्या ताणतणावामुळे पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही महागडी औषधे किंवा कठीण व्यायामापेक्षा नियमित चालणे बेस्ट आहे.
हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी पुरुषांनी एका दिवसात नेमके किती चालावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी दिवसातून किमान ७,००० ते १०,००० पावले चालणे अत्यंत फायदेशीर आहे.
दररोज सलग ३० ते ४५ मिनिटे वेगाने चाललात तर आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो.
नियमित चालल्यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
चालण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते
पोटावर आणि शरीरावर साचलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी चालल्याने फायदा होतो.
नियमित चालण्याने शरीराचा स्टॅमिना आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.