Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Gold-Silver Price Update: ऐन सणासुदीच्या काळात सोनं-चांदीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात २२० पर्यंत तर चांदीत ५,००० ची घसरण झाली आहे.
Gold Rate Today
Gold Price TodaySaam Tv
Published On

सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.देशांतर्गत सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आठवड्या भरात घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यात विविध शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल २२० रुपयांपर्यंत, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

१३ सप्टेंबरच्या ताज्या दरानुसार, राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५४,७३० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,८५० रुपये आहे. मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोनं १,५४,५८० रुपये तर २२ कॅरेट सोनं १,४१,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

Gold Rate Today
PM Kisan Yojana Update : शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा

चेन्नई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्येही २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,५८० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोनं १,५४,६३० रुपये तर २२ कॅरेट सोनं १,४१,७५० रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात कमजोरी दिसून आली असून स्पॉट गोल्डचा भाव ४,३६३.०१ डॉलर प्रति औंसवर आहे. एका आठवड्यात जागतिक सोन्याचा भाव सुमारे १.५ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एका आठवड्यात चांदी तब्बल ५,००० रुपयांनी स्वस्त झाली असून १३ सप्टेंबरला देशांतर्गत बाजारात चांदीचा दर २,४५,००० रुपये प्रति किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर ६४.५४ डॉलर प्रति औंसवर आहे.

Gold Rate Today
Lek Ladki Yojana : मुलींसाठी मोठी खुशखबर! ‘लेक लाडकी’ योजनेचा हजारो कुटुंबांना लाभ, आवश्यक कागदपत्रे कोणती? वाचा

विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारीमध्ये देशात चांदीचा भाव विक्रमी ४ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. त्यानंतर आतापर्यंत चांदीच्या दरात जवळपास ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सध्याचा भाव गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com