लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक मोठी कारवाई केलीय. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिलेत.(Latest News)
निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमधील वरिष्ठ ब्युरोक्रॅट्सच्या बदलीचे आदेश दिलेत. ६ राज्यातील गृह सचिवांच्या बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. या राज्यांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्याचा समावेश आहे. यासह पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांनाही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. पश्चिम बंगाल मध्ये मागील काही दिवसांपासून ज्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय.
कोण आहेत इकबाल सिंह चहल?
इकबाल सिंह चहल हे १९८९ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत. चहल सध्या मुंबई महानगरपालिकचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. याआधी चहल यांनी विविध अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. ठाणे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. यानंतर ते गृह मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयात सहसचिव देखील होते.
याशिवाय चहल हे महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग आणि नगरविकास विभागात प्रधान सचिव देखील होते. याशिवाय चहल हे महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग आणि नगरविकास विभागात प्रधान सचिव देखील होते. दरम्यान चहल यांनी कोस्टल रोड प्रोजेक्ट, रुग्णालयाचे आधुनिककरण, मुंबई शहर सुशोभीकरण, रस्त्यांची कामे आदी कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.