लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या आचारसंहितेचा फटका म्हाडा कार्यालयातील लोकशाही दिनाला बसला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणाऱ्या 'म्हाडा लोकशाही दिनाचे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांकरिता आयोजन करण्यात येणार नाही. पुढील 'म्हाडा लोकशाही दिन आता थेट १० जून , २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत महत्वाची अपडेट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली रवाना. मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.
भाजप मुख्यालयात भाजप कोअर ग्रुपच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. बैठकीच्या सुरुवातीला राजस्थानच्या लोकसभा जागावाटप बाबत बैठकीत चर्चा होणार आहे. राजस्थानपाठोपाठ उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील नेते दिल्लीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्राची बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीचं जागावाटप चार जागांवरुन अडलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगली, भिवंडी, रामटेक, वर्धा या जागांवरुन महाविकास आघाडीत चढाओढ पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर भिवंडीच्या जागेसाठी पवार गट आग्रही आहे.
सांगलीला विशाल पाटील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील संभाव्य उमेदवार आहेत. तर भिवंडीला बाळ्या मामा म्हात्रे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार तर काँग्रेसकडून दयानंद चोरगे इच्छुक आहेत. रामटेकची जागा राखीव असून तिथून काँग्रेस उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे. तर वर्ध्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि पवार गटात स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे.
बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावामध्ये मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. उंदरी गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला आलेले, आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे, नंदकिशोर मुंदडा यांची गाडी मराठा बांधवांनी अडवली. त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहच्या कार्यक्रमाला जायचं नाही, असं देखील बजावलं. दरम्यान यावेळी काही काळ मराठा बांधव आणि नंदकिशोर मुंदडा यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाल्याच पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
लोकांच्या कामांसाठी आम्ही त्यात व्यस्त होतो.
महायुतीने केलेल्या कामांचा पाढा मी वाचू इच्छित नही.
शेतकरी युवा बेरोजगर आणि उद्योग यात महाराष्ट्र पुढे आहे.
कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू, अनेक काम आजही प्रगती पथावर आहेत.
आज केंद्र आणि राज्यसरकर हे डबल इंजिन सरकारने अनेक कामांना प्राधान्य दिलं.
कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती.
हिंगोलीत उद्धव ठाकरे यांच्या सभेत मराठा आंदोलक म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले आंदोलक हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे समजलं आहे. धक्कादायक म्हणजे हातात काळे झेंडे घेऊन शिंदे सेनेतील हे शिवसैनिक एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देत होते.
राज्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून पुणे पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिसांच्या वतीने 'रुट मार्च’ काढण्यात आला
वाघोली येथील पोलीस चौकीपासून ते नगर पुणे रोडने वाघेश्वर मंदिर पुढे गोरेवस्ती तसेच वाघोली गावामधून पुन्हा नगर रोडने चौकीपर्यंत 'रुट मार्च' काढण्यात आला होता.
लोणीकंद पोलिस येणाऱ्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबारीची घटना घडली होती. ज्यामध्ये एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे.
मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर पार पडलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरवातीला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ऐवजी देशभक्तांनो असे शब्द वापरले होते. यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली अशी टीका केली होती. त्याला आता हिंगोलीच्या वसमतमधील सभेतून उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. 'मला आता देश वाचवायचा आहे त्यामुळे देश भक्तांनो म्हटलो आहे. भाजपाचे लोक देशभक्त नाहीत का, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही घरे फोडण्याचे लायसन्स घेऊन टाका; अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल
शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस
इशारा सभेत वापरलेल्या जेसीबीवर देखील कारवाईचे संकेत
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राज्यातील सीमांवरील चेक पोस्ट झाले अॅक्टिव्ह
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी कर्नाटक पोलीस आणि निवडणूक आयोगाच विशेष तपासणी पथक
कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनाची होतेय कसून तपासणी
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटकमधील यंत्रणा अलर्ट
मुंबई भाजपची दुपारी २ वाजता वसंत स्मृती भाजप कार्यालयात बैठक
भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावली बैठक
भाजपचे सर्व मुंबईतले आमदार, माजी नगरसेवक, भाजपचे मुंबईतले सर्व विभाग अध्यक्ष यांची बोलावली बैठक
मुंबईत अजूनही तीन जागांचा तिढा न सुटल्याने बोलावली बैठक
भाजप मुंबईमधे लोकसभेच्या पाच जागा लढवण्यावर ठाम असून, दोन जागांचे उमेदवार भाजपने घोषित केलेत
मंत्री शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीने विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न
विजय शिवतारेंना घेऊन शंभुराज देसाई मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षवार दखल
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही घेणार भेट
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे सायकलवरील जाणाऱ्या विद्यार्थिनीला भारधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला होता.
या अपघातात गंभीरित्या जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू होते.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
ट्रक चालकाविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला
मेघदूत बंगल्यात अमर साबळे दाखल
अमर साबळे यांचे नाव सोलापुरातील लोकसभा मध्ये चर्चेत
लोकसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस अमर साबळे
- नाशिकची जागा भाजपला सोडण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
- नाशिकमध्येभाजपचे 3 आमदार आणि 66 नगरसेवकांची ताकद
- हेमंत गोडसे आतापर्यंत भाजपमुळेच खासदार
- मात्र आता हेमंत गोडसे यांच्या विषयी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी, भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा
- आपकी बार 400 पारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी
- भाजप पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्षांची वरिष्ठांकडे मागणी
- भाजपकडून शिवसेनेवर दबावतंत्र
महिला आरक्षणाबाबत मोठी बातमी
महिला आरक्षणाबाबत केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
महिला आरक्षण तात्काळ लागू केलं जाऊ शकत नाही - केंद्र सरकार
जया ठाकूर यांनी दाखल केलेली याचिका घटनाबाह्य... त्यामुळं ती न्यायालयाने रद्द करावी
कायद्याला अनुसरूनच राजकारणात महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकतं - केंद्र सरकार
जनगणनेनुसारच आरक्षण दिलं जाऊ शकतं - केंद्र सरकार
भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची येत्या २ दिवसांत दिल्लीत होणार बैठक
रामटेक व गडचिरोली जागांवर चर्चेची शक्यता
रामटेकची जागा सध्या शिवसेनेकडे, या जागेवर भाजपचा दावा
भाजपच्या गडचिरोली जागेची राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी
दोन दिवसांत दोन्ही जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बीजवाई कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बियाण्याचं उत्पादन घेतलं जातं.
सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत असताना काल या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आणि त्यातून शेकडो हेक्टरवरील बीजवाई कांद्याचं नुकसान झालं.
सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा
सुनेत्रा पवार आज हवेली तालुक्याच्या दौऱ्यावर
हवेली तालुक्यातील अनेक गावांना सुनेत्रा पवार आज देणार भेटी
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी आज महिला मेळाव्याचे देखील आयोजन
आपण महायुतीमध्येच आहोत, वेगळी भूमिका घेऊ नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांना सूचना
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना सूचना
आपण सगळे महायुतीत आहोत कोणी वेगळी भूमिका घेऊ नका, एकत्र येऊन निवडणुका लढवू आणि विजय मिळवू, शिंदेंच्या शिवसैनिकांना सूचना
आपण महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे आणि विजय मिळवायचा आहे, शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
Thane News : खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व धाब्यांना काल दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची तारांबळ उडली. परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग पसरत होती. अखेर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
अनेक राज्यांच्या भाजप कोअर ग्रुपची आज बैठक
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री शाह यांच्यासोबत यूपीसह इतर राज्यांची बैठक
या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार
पण उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब मात्र केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत होणार
अरबी समुद्रात भारतीय नौदलाची मोठी कामगिरी
35 सोमालियन चाचांनी केलं आत्मसमर्पणसोमालियन समुद्री डाकूंविरुद्ध भारतीय नौदलाने केलेली गेल्या सात वर्षांतील सगळ्यात मोठी कृती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.