नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. ईव्हीएम हॅक होऊ शकतं या विरोधकांच्या आरोपांही उत्तर अयोगाने दिलंय. ईव्हीएम बाबत अफवा पसरवल्या जात असल्याचं निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या.
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं. ईव्हीएमबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या असून सर्व आरोप निराधार असल्याचं जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्यात. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी नाही, या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. ईव्हीएम कोणत्याही मशीनला जोडलेले नसल्याचं ही त्या म्हणाल्या.
दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ईव्हीएम ब्लॅक बॉक्स असल्याचं टीका केली होती. त्याला उत्तर देताना आयोग म्हणाले, माध्यमात येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाहीये. उलट निकाल हे बटण दाबून प्राप्त होत असते. "निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबतची संपूर्ण प्रक्रिया पाळलीय."
दरम्यान स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनीही ईव्हीएम वापरावर शंका उपस्थित केली होती. तसेच त्यांनी ईव्हीएमचा वापर बंद करावा असाही सल्ला दिला होता. मस्क यांच्या विधानानंतर राहुल गांधींनी ईव्हीएमच्या वापरावर टीका केली होती. खासदार राहुल गांधी यांनी ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स' आहे. त्याला तपासण्याची परवानगी कोणालाही नाही. भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत 'गंभीर चिंता' उपस्थित होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी १५ जून रोजी लिहिले - ईव्हीएम रद्द केले पाहिजे. हे मानव किंवा AI द्वारे हॅक करण्याचा धोका आहे. हा धोका कमी असला तरी तो खूप जास्त आहे. यामुळे अमेरिकेत यातून मतदान होऊ नये, असं एलन मस्क म्हणाले होते. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, मानव आणि एआयच्या मदतीने मशीन हॅक होण्याचा धोका आहे.
रॉबर्ट एफ केनेडी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोर्तो रिकोमधील निवडणुकीदरम्यान ईव्हीएममधील अनियमिततेबद्दल लिहिलं होतं. त्यांनी पोर्तो रिकोच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित मतदानात अनेक त्रुटी समोर आल्याचं सांगितलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.