जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक टेस्ला आणि एक्सचे मालक एलन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ईव्हीएम मशीन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हे हॅक करता येऊ शकते, असे एलन मस्क यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मानवी हस्तक्षेपामुळे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे.
एलन मस्क यांनी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (Elon Musk X Post On EVM Machine) वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता वातावरण पेटल्याचं दिसत आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या विधानाला विरोध केलाय. त्यांनी यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हे एक अतिशय सामान्य विधान असल्याचं म्हटलं आहे. असं कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नसल्याचं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. भारतीय ईव्हीएम कस्टम-डिझाइन केलेले, सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्कपासून वेगळे आहेत. ईव्हीएममध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसल्याचं त्यांनी म्हटलं (EVM Machine) आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांची पोस्ट शेअर करताना एलोन मस्क यांनी (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, मानव आणि एआयच्या मदतीने मशीन हॅक होण्याचा धोका आहे. रॉबर्ट एफ केनेडी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोर्तो रिकोमधील निवडणुकीदरम्यान ईव्हीएममधील अनियमिततेबद्दल लिहिलं होतं. त्यांनी पोर्तो रिकोच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित मतदानात अनेक त्रुटी समोर आल्याचं सांगितलं होतं.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीनचा वापर करत गैरप्रकार केल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह (Elections Voting) निर्माण झाले आहेत. यावर आता राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एलन मस्कची पोस्ट शेअर करत ईव्हीएम मशीनला ब्लॅक बॉक्स म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.