Mamata Banerjee and Abhijit Gangopadhyay Saam Tv
देश विदेश

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर आक्षेपार्ह टप्पणी करणं भाजप उमेदवाराला पडलं महागात, निवडणूक आयोगाने केली मोठी कारवाई

Lok Sabha Election 2024: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि पश्चिम बंगालच्या तामलुक लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांना महागात पडलं आहे.

Satish Kengar

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि पश्चिम बंगालच्या तामलुक लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांना महागात पडलं आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी कडक कारवाई करत त्यांच्यावर २४ तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे. भविष्यातही आक्षेपार्ह टिप्पणी करणं टाळण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे.

तमलूक लोकसभा मतदारसंघासाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. आयोगाने याआधी भाजप उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांना १५ मे रोजी हल्दिया येथे निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल नोटीस बजावली होती आणि २० मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. यानंतर त्यांनी याबाबत त्यावर आयोगासमोर आपली बाजू मांडली होती.

मात्र त्यांच्या उत्तराने आयोगाचे समाधान झाले नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. भाजप उमेदवारावर करण्यात आलेल्या या कारवाईबाबत आयोगाने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही कळवले आहे. तसंच महिलांच्या सन्मानाविरुद्ध त्यांचं हे असभ्य असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

भाजपचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर केलेल्या कारवाईत आयोगाने मंगळवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पुढील २४ तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. महिलांसह कोणाच्याही विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यास मनाई करणाऱ्या आदर्श आचारसंहितेअंतर्गत आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आयोगाने आणखी तीन जणांवर यायाआधीच कारवाई केली आहे. अभिनेत्री कंगना राणौत विरोधात वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली. दुसरी कारवाई भाजप नेते दिलीप घोष यांच्यावर ममता बॅनर्जी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल, तर तिसरी कारवाई काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT