ED officials arrest Karumuri Sunil Kumar in connection with a multi-crore corruption and sub-contract scam. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Karumuri Sunil Kumar Corruption Case Full Details: प्रवर्तन निदेशालयाने (ED) मोठी कारवाई करत माजी मंत्र्याच्या मुलाला अटक केली आहे. कोट्यवधींच्या घोटाळ्यात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

केंद्रीय तपास यंत्रणा प्रवर्तन निदेशालय ED ने मोठी कारवाई करत वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री करूमरी नागेश्वर राव यांच्यामुलाला करूमरी सुनिल कुमार याला अटक केली आहे. आंध्र प्रदेश झोनल कार्यालयाने ही कारवाई केली असून 18 जून रोजी त्याला ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यामध्ये ईडी कोठडी देखील मागितली जाणार आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, करुमुरी सुनील कुमार याची या कथित घोटाळ्यात मुख्य सूत्रधार म्हणून भूमिका समोर आली आहे. त्याने आपल्या वडिलांच्या राजकीय शक्तीचा वापर करून जवळच्या व्यक्तींना आणि संबंधित संस्थांना सब-कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याचा आरोप आहे.

85% नफ्याची अट

मेसर्स श्री सुदर्शना कन्स्ट्रक्शन्स या सब-कॉन्ट्रॅक्टरला परिवहन व्यवसायातून होणाऱ्या नफ्यातील तब्बल 85 टक्के हिस्सा स्वतःला आणि कुटुंबाला देण्याची अट घालण्यात आली होती.

तपासात असे देखील समोर आले आहे की, सुनिल कुमारने काही निवडक संस्थांना आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांना सब कॉंट्रॅक्ट मिळवून दिले. तसेच खर्चापेक्षा 50 ते 60 लाख रुपये जास्त दाखवून बिल तयार करण्यात आले. या पैशाचा वापर गुन्हेगारीसाठी केला जायचा असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

कोट्यवधींचा आर्थिक गैरवापर

एजन्सीच्या माहितीनुसार, श्री सुदर्शना कन्स्ट्रक्शन्सला मिळालेल्या 68.28 कोटी रुपयांपैकी सुमारे 11.91 कोटी रुपये थेट किंवा अप्रत्यक्षपणे सुनील कुमार आणि त्याच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी वापरण्यात आले. या रकमेत त्याची पत्नी कीर्ती वल्लुरी आणि आई करुमुरी लक्ष्मी किरण यांचाही लाभ झाल्याचे समोर आले आहे. तपासात असेही आरोप आहेत की, या अवैध पैशातून सुनील कुमारने लक्झरी गाड्या आणि महागड्या घड्याळांची खरेदी केली. तसेच, हा पैसा माजी मंत्री करुमुरी नागेश्वर राव यांच्या राजकीय कॅम्प कार्यालयाच्या कामकाजासाठीही वापरला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT