

राज्यसभा निवडणुकीत एनडीएचे उमेदवार परिमल नाथवानी विजयी झाले.
इंडिया आघाडीतील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का
या निकालामुळे झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारची राजकीय अडचण वाढण्याची शक्यता
राज्यसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. एनडीएचे उमेदवार परिमल नाथवानी हे झारखंडमधील राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेत. त्यांच्या या विजयाकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीसाठी एक धक्का म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीदरम्यान 'इंडिया' आघाडीच्या काही आमदारांनी 'क्रॉस-व्होटिंग' केल्याचे वृत्त समोर आले आहे.
झारखंडमध्ये राज्यसभा निवडणुकीत झारखंडमध्ये खरी लढत परिमल नाथवाणी आणि काँग्रेसचे प्रणव झा यांच्यातच होती. या चुरशीच्या लढतीत परिमाल नाथवाणी यांना ३० मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाच्या प्रणव झा यांना फक्त २० मते मिळाली. दरम्यान या निवडणुकीत जेएमएमचे (JMM) वैद्यनाथ राम विजयी झाले; मात्र, त्यांचा विजय आधीच निश्चित मानला जात होता.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'क्रॉस-व्होटिंग'मुळे एनडीएचा उमेदवार अपक्ष म्हणून परिमल नाथवानी यांचा विजय झाला. झारखंडमध्ये दोन राज्यसभेच्या जागा होत्या, त्यापैक एकावर विजय मिळवत काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा यांना पराभूत केलं. तर दुसऱ्या जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार बैद्यनाथ राम यांचा विजय झाला. निवडणूक अधिकाऱ्याने सांगितलं की, नाथवानी यांना २८ मते मिळाले,त्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.
तर वैद्यनाथ राम यांना ३० मते मिळाली आणि तीन मते अमान्य करण्यात आली. यातील तीन मतांमध्ये एक काँग्रेसचा आहे तर २ भाजपचे असल्याचं समोर आलेत. भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएजवळ राज्यातील २४ आमदार आहेत. ही संख्या राज्यसभेत एक जागा निश्चित करण्यास पुरेसे नाहीत. ८१ आमदार असलेल्या या विधानसभेत पहिल्या पसंतीसाठी किमती कमी २८ जागा हव्यात. ज्यात ४ जागा कमी आहेत. म्हणजेच परिमल नाथवानी यांना विरोधी पक्षातून पहिल्या पंसतीच्या मतदानावेळी चार मते मिळाली आहेत.
सत्ताधारी 'इंडिया' (INDIA) आघाडीमध्ये JMM आणि काँग्रेसचा समावेश आहे. विधीमंडळात त्यांचे एकूण ५६ सदस्य आहेत. निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भाजपचे आमदार प्रदीप प्रसाद म्हणाले, "NDA ला २८, JMM ला ३० आणि काँग्रेसला २० मते मिळाली. तर तीन मते अवैध ठरवण्यात आली. परिमल नाथवानी यांना २८ मते मिळाली.
विजयानंतर परिमल नाथवानी यांनी झारखंडची जनता आणि एनडीए नेतृत्तवाचे आभार मानले. त्यांनी सोशल मीडिया साईटवरील एक्सवर पोस्ट करत राज्यसभा सदस्य म्हणून चौथ्यांदा सेवा करण्याची संधी मिळाल्याने मी तुमचे आभार व्यक्त करतो. हे क्षण भावुक करणारे आहेत, कारण झारखंडमध्ये ही तिसरी टर्म आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.