Karnataka MLC Election: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय; भाजपचं काय झालं? वाचा

Karnataka MLC Results 2026: कर्नाटक विधान परिषद (MLC) निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. यात काँग्रेसचे पाच उमेदवार विजयी झालेत, तर भाजपचे फक्त दोन उमेदवार विजयी झालेत. कोण विजयी झाले ते जाणून घ्या.
Karnataka MLC Results 2026:
KARNATAKA MLC ELECTION 2026: CONGRESS WINS 5 SEATS, BJP SECURES ONLY 2 VICTORIESSaam tv
Published On
Summary
  • कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला.

  • भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

  • या निकालामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत झालं आहे.

महाराष्ट्रात आज विधान परिषदेच्या १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात भाजपचा बोलबाला दिसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात मात्र काँग्रेसनं मोठा विजय मिळवला आहे. कर्नाटक राज्यात विधान परिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या आज झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेत. जेडी(एस)नेही या निवडणुकीत उमेदवार उभा केला होता, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.

Karnataka MLC Results 2026:
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार अडचणीत येणार; उद्धव ठाकरे टाकणार अखेरचा डाव, काय आहे प्लॅन?

कोणते उमेदवार विजयी झालेत?

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे बीके हरिप्रसाद, थिप्पन्नप्पा कामकनूर, पीव्ही मोहन, शिवन्ना बीएस(मालवल्ली) आणि विनय कार्तिक हे विजयी झाले. तर भाजपचे लिंगराज पाटील आणि रघु आर हेदेखील विजयी झाले. दरम्यान या निवडणुकीत जनता दल एसचे उमेदवार गोविंदराजू यांचा पराभव झाला.

काँग्रेसकडून मॉक पोलिंग

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि चुका होऊ नये, यासाठी काँग्रेसनं आमदारासाठी मॉक मतदान घेतलं होतं. काँग्रेसने आपल्या सर्व १३५ आमदारांना एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी ठेवलं होतं. मतदानाच्या एका दिवसाआधी काँग्रेस पक्षाने रिसॉर्टमध्ये आमदारसाठी मॉक मतदान प्रक्रिया राबवली होती. तेथे आमदारांना विधान परिषदेसाठी कशाप्रकारे मतदान प्रक्रिया पार पडते यांची माहिती देण्यात आली.

Karnataka MLC Results 2026:
खासदारांची फोडाफाडी का होतेय? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

या मॉक पोलिंगमध्ये मुख्यमंत्री डीएक शिवकुमार यांनीही सहभाग घेतला होता. मॉक पोलिंग का घेण्यात आली होती, असा प्रश्न अनेकांना पडला असेल ,त्याचे कारण म्हणजे, काँग्रेसचे ४० आमदार हे पहिल्यांदा निवडून आलेत. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेचं योग्य माहिती असावी यासाठी मॉक पोलिंग घेण्यात आली होती.

७ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात

कर्नाटकच्या विधान परिषदेच्या ७ जागांसाठी ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामुळे मतदान घ्यावे लागले. काँग्रेसचे ४ उमेदवार आणि भाजपचे दोन उमेदवारांच्या सहज विजय झाला. खरी चुरशीची लढत काँग्रेसचे पाचवे उमेदवार विनय कार्तिक आणि जेडी(एस)चे उमेदवार गोविंदराजू यांच्यात होती.

एका उमेदवाराला विजयासाठी हवं होतं २८ आमदारांचं मत

MLC निवडणुकीसाठी २८ आमदारांचे समर्थन हवं होतं. काँग्रेसच्या ५ व्या उमेदवाराची विजयाचा भक्कम दावेदार होता. पहिल्या पसंतीमध्ये कोणत्याच उमेदवाराला २८ मते मिळण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या फेरीची गरज होती. त्यात काँग्रेसचे उमेदवार विनय कार्तिक यांना जास्त मते मिळाली आणि ते त्यांचा विजय झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com