मुंबई : रशियामध्ये आज १८ ऑगस्ट रोजी ७ रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडील हा कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्याजवळ होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. या भूकंपाचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.
रशियामध्ये ७ रिश्टर स्केलचा भूकंप
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या (Russia Earthquake) माहितीनुसार, हा भूकंप १८ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून ५ मिनिटांनी झालाय. त्याचे केंद्र पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहरापासून ९० किलोमीटर पूर्वेला सुमारे ५० किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाची तीव्रता पाहून अमेरिकेने त्सुनामीचा इशारा दिलाय.
त्सुनामीचा इशारा
भूकंपानंतर शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. मिळालेल्या माहितीनुसार ज्वालामुखीची राख समुद्रसपाटीपासून ८ किलोमीटर वर वाढत आहे. ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर आल्याचं देखील अहवालामध्ये (Russia Earthquake News) म्हटलंय. या भूकंपात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त अजून मिळालेलं नाही. शिवलुच ज्वालामुखी पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्कीपासून सुमारे २८० मैलांवर आहे.भूकंपामुळे मोठी हानी झाली नाही, परंतु काही इमारतींचं नुकसान झालेलं नाही.
नागरिकांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण
भूकंपामुळे रशियन आपत्कालीन मंत्रालयाने अद्याप त्सुनामीचा इशारा जारी केला (tsunami warning) नाही. परंतु, यूएस त्सुनामी चेतावणी प्रणालीने चेतावणी दिलीय की, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किमीच्या आत रशियाच्या किनारपट्टीवर या भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा येऊ शकतात. भूकंपामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर पडले (Earthquake News) होते. त्यांच्यामध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. समोर आलेल्या भूकंपाच्या व्हिडिओमध्ये इमारती गदागदा हालताना दिसत आहेत. भिंतीवरील सामान खाली पडत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.