Earthquake In Sangli: मोठी बातमी! सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Earthquake In Sangli At Chandoli Dam Area: सांगलीत पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. चांदोली धरण परिसरात जमीन हादरल्याचं समोर आलंय.
सांगलीत भूकंप
Earthquake In Sangli Saam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु जमीन हादरल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं समोर आलंय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सांगलीत पहाटे भूकंप

हा भूकपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला (Earthquake In Sangli) आहे. या धक्क्यामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्र बिंदु वारणावतीपासुन ८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही, असं धरण प्रशासनाने सांगितलं आहे. पहाटेची वेळ आणि निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. या धक्क्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

चांदोली धरण परिसरात जमिन हादरली

मागील काही दिवसांपासून सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू (Sangli News) आहे. नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे. चांदोली धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे, असं असतानाच हा भूकंप झालाय. धरणातून पाण्याचा विसर्ग होत असताना भूकंपाचे हादरे आज पहाटे जाणवले. त्यामुळे नदीकाठील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु हा भूकंप सौम्य स्वरूपाचा होता, त्यामुळे धरणास कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय.

सांगलीत भूकंप
Koyna Earthquake News : कोयना परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के, सुदैवाने जीवितहानी नाही

गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मागील महिन्यात मराठवाड्यात भूकंप झाल्याचं समोर आलं होतं. भूकंपाच्या धक्क्यांनी (Chandoli Dam Area) परभणी, नांदेड, हिंगोली, जालना हे चार जिल्हे हादरले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. सांगलीत आज झालेला भूकंप ३ रिश्टर स्केलचा होता. परंतु भूकंप झाल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Earthquake News) आहे. अतिवृष्टी चांदोली धरण जवळपास ८२ टक्के भरल्याचं समोर आलंय.

सांगलीत भूकंप
Chile Earthquake: ब्रेकिंग! ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने चिली हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com