Earthquake News : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला; हिंगोली, नांदेडसह परभणीत भूकंपाचे धक्के, नागरिक धास्तावले

Hingoli-Nanded-Parbhani Earthquake News Today : एक मोठी बातमी समोर येत आहे. हिंगोली, नांदेड आणि जिल्ह्याला बुधवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दोन्ही जिल्हे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेले आहेत.
Earthquake News : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला; हिंगोली, नांदेडसह परभणीत जमीन हादरली, नागरिक धास्तावले
Hingoli Earthquake News TodaySaam TV

एक मोठी बातमी समोर येत आहे. हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला बुधवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. तिन्ही जिल्हे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद ४.२ इतकी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये (Hingoli Earthquake News) बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ओंढा, हिंगोली, वसमतसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये भल्यापहाटे जमीन हादरली.

अचानक कंपन होऊन घरातील भांड्यांची पडझड होऊ लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले. गाढ झोपेत असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवण्यात आली.

दुसरीकडे नांदेड (Nanded Earthquake News) जिल्ह्यालाही सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरुन घराबाहेर आले.

Earthquake News : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला; हिंगोली, नांदेडसह परभणीत जमीन हादरली, नागरिक धास्तावले
Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

नांदेडमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदु हा हिंगोली जिल्ह्यात असल्याचं कळतंय. दरम्यान, परभणी जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातही भल्यापहाटे ४.२ तीव्रतेचा भूकंपांचा धक्का (Parbhani Earthquake News) जाणवला. त्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये पुन्हा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुन्हा भूकंपाचे (Earthquake News) धक्के बसल्यास मोकळ्या जागी येऊन थांबावे, असंही सांगण्यात आलं आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून भूकंप क्षेत्राची पाहणी केली जात आहे.

भूकंप झाला तर काय काळजी घ्याल?

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर तुम्ही एखाद्या इमारतीत असाल, तर तातडीने मोकळ्या जागी येऊन थांबावे. बाहेर पडणे शक्य न झाल्यास एखाद्या मजबूत फर्निचरचा, टेबलचा आसरा घेऊन त्याखाली आसरा घ्यावा. शक्य झाल्यास तात्काळ घरातून, इमारतीमधून बाहेर पडा आणि मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करा

Earthquake News : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला; हिंगोली, नांदेडसह परभणीत जमीन हादरली, नागरिक धास्तावले
Bus Accident Video : चालकाचे नियंत्रण सुटलं अन् खासगी बस थेट दरीत, सापुतारा घाटातील अपघाताचा थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com