Bus Accident Video : चालकाचे नियंत्रण सुटलं अन् खासगी बस थेट दरीत, सापुतारा घाटातील अपघाताचा थरारक VIDEO

Saputara Ghat Bus Accident Video : सापुतारा घाटातील खासगी बस अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. बसमधील एका प्रवासी निसर्ग सौंदर्य टिपत असतानाच अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही

गुजरातमधील सापुतारा घाटात रविवारी एका खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर ६० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. या थरारक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

बसमधील एका प्रवासी निसर्गसौंदर्य टिपत असतानाच त्याचवेळी हा अपघात झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बसमध्ये बसलेल्या एक प्रवासी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात सापुतारा घाटातील निसर्ग सौंदर्य टिपत आहे.

त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटते. काही क्षणातच बसमध्ये आरडाओरड सुरू होते. त्याचवेळी या प्रवाशाच्या हातातून मोबाइल खाली पडतो. मात्र, व्हिडीओ बंद झाला तरी मोबाइलच्या ऑडिओ सुरूच असतो.

यामध्ये बसच्या काचा तसेच खिडक्या फुटण्याचा आवाज येतो. बस खोल दरीत कोसळल्यानंतर प्रवाशांच्या किंचाळ्या देखील ऐकू येतात. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com