Isro Study Special Report News Saam Tv
देश विदेश

Isro Study Special Report : पृथ्वी नष्ट होणार, लघुग्रह धडकताच मानवसृष्टीचा विनाश होणार? शास्त्रज्ञांचं म्हणणं काय? पाहा व्हिडिओ

Isro Study Special Report News : पृथ्वी नष्ट होणार. एक लघुग्रह पृथ्वीवर धडकेल आणि मानवसृष्टी नष्ट होईल अशी भीती इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. हा लघुग्रह कोणता आहे? कधी पृथ्वीवर धडकणार? पाहुयात हा रिपोर्ट.

Mayuresh Kadav

मुंबई : पृथ्वी नष्ट होणार हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र, इस्त्रोने दिलेला इशारा हा गंभीर आहे. पृथ्वीवर मोठं संकट येण्याची शक्यता असल्याचं इस्त्रोने म्हटलंय. अपोफिस लघुग्रह हा पृथ्वीवर आदळला तर जगाचा नाश करेल, अशी भीती इस्रो प्रमुखांनी व्यक्त केलीय.

पृथ्वी नष्ट होणार?

पृथ्वी नष्ट करणाऱ्या धोकादायक लघुग्रहाचे नाव अपोफिस आहे. एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर माणूस नष्ट होईल. इस्रो सध्या अपोफिस लघुग्रहावर सतत लक्ष ठेवून आहे. लघुग्रहाच्या ट्रॅकिंगसाठी NETRA हा प्रकल्प सुरू केलाय.

या लघुग्रहाचा पृथ्वीला धोका होऊ नये यासाठी एपोफिसवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. जगातील सर्व मोठे देश यासाठी तयारी करत आहेत. भारतानेही तयारी सुरू केलीय. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनीही या लघुग्रहाबाबत चिंता व्यक्त केलीय. त्यांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हा अपोफिस लघुग्रह कसा आहे पाहुयात.

कसा आहे अपोफिस लघुग्रह?

अपोफिस लघुग्रह हा पाच वर्षांनी पृथ्वीच्या अगदी जवळ येईल.

अपोफिस हा लघुग्रह 1230 फूट रुंद आहे.

साडेतीन फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढा मोठा आहे.

2068 मध्ये लघुग्रह पृथ्वीला धडकू शकतो.

त्याआधी दोनदा पृथ्वीजवळून जाईल.

13 एप्रिल 2029 ला लघुग्रह पृथ्वीजवळून जाईल.

त्यानंतर तो पृथ्वीपासून केवळ 32 हजार किलोमीटर अंतरावरून बाहेर येईल. इस्रोचा अंदाज आहे की, जर 300 मीटर मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तो संपूर्ण आशिया नष्ट करू शकतो. मनुष्य, प्राणी जिवंत राहणार नाहीत. त्यामुळे इस्त्रो सतर्क असून, या लघुग्रहाला रोखण्यासाठी सज्ज झालीय. तरीदेखील हा लघुग्रह पृथ्वीवर धडकलाच तर पृथ्वी नष्ट होऊ शकते. मात्र अनेक शास्त्रज्ञांनी या अॅस्ट्रॉईडबाबत विविध मतं नोंदवलेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio, Airtel, Vi बजेट फ्रेंडली प्लॅन्स, ३ महिन्यांसाठी 'हे' आहेत परवडणारे रिचार्ज

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Satpura Tourism: धुक्याने नटलेले सातपुडा; ‘विंटर वंडरलँड’ पाहण्यासाठी लोकांची उसळली गर्दी

EPFO Rule: EPFOचे ८ नियम बदलले; कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम

KDMC निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं; २७ गावांचा प्रश्न पेटला, स्वतंत्र नगरपालिकेची मागणी

SCROLL FOR NEXT