

सणासुदीला पैशाची कामं बऱ्याचदा रखडू शकतात. कारण या दिवसांमध्ये बँकांना सुट्ट्या जाहीर केलेल्या असतात. उद्या ११ नोव्हेंबर २०२६ रोजी देशातल्या काही शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. भाऊबीज, लक्ष्मीपूजन, निंगोल चौकुब आणि चित्रगुप्त जयंती या सणांमुळे काही राज्यांमध्ये बँकांचं कामकाज बंद राहील. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातल्या सुट्टीची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नोव्हेंबर २०२६ च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, बुधवारी पुढे दिलेल्या शहरांमधल्या बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत.
कानपूर आणि लखनऊ (उत्तर प्रदेश): भाऊबीज आणि चित्रगुप्त जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
गंगटोक (सिक्कीम): लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजमुळे बँका बंद राहतील.
इम्फाळ (मणिपूर): निंगोल चौकुबा सणानिमित्त बँकांचे कामकाज होणार नाही.
कोलकाता (पश्चिम बंगाल): लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजमुळे बँकांना सुट्टी असेल.
शिमला (हिमाचल प्रदेश): लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
नोव्हेंबरच्या या आठवड्यातही विविध सणांमुळे बँकांना सुट्ट्या आहेत.
१० नोव्हेंबर, मंगळवार: बलिप्रतिपदा आणि विक्रम संवत नववर्षानिमित्त मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरूसोबत काही केंद्रांमध्ये बँका बंद होत्या.
११ नोव्हेंबर, बुधवार: भाऊबीज, लक्ष्मीपूजन, निंगोल चौकुबा आणि चित्रगुप्त जयंतीनिमित्त काही शहरांमध्ये बँका बंद राहतील.
१५ नोव्हेंबर, रविवार: साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
बँकांच्या शाखांना सुट्टी असती तरी ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, NEFT, RTGS आणि IMPS या डिजिटल सेवा सुरू राहणार आहेत. तसेच ATM मधून पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध असेल. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायचे व्यवहार असतील, तर सुट्टीचे दिवस लक्षात घेऊन आधीच नियोजन करा. बँकेची सुट्टी शहर आणि राज्यानुसार बदलते. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी RBI चे अधिकृत हॉलिडे कॅलेंडर तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.