Winter Skincare : हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावूनही त्वचा कोरडी पडतेय? तर हे सोपे घरगुती उपाय करून पहा

glowing skin tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे ही एक सामान्य समस्या आहे, कारण हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी झाल्याने त्वचेमधील ओलावा झपाट्याने नाहीसा होतो. अशा वेळी केवळ मॉइश्चरायझर लावण्याऐवजी ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने लावल्यास त्वचा दिवसभर मऊ व हायड्रेटेड राहू शकते.
best home remedies for extreme dry skin during winter season
best home remedies for extreme dry skin during winter seasonsaam tv
Published On: 

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी होऊ लागते. त्वचा मऊ ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रिम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करतात, पण बऱ्याचदा असे दिसून येते की मॉइश्चरायझर लावल्यानंतरही त्वचा कोरडीच राहते आणि पांढरे डाग किंवा खवले दिसू लागतात. जर तुमच्यासोबतही असे होत असेल, तर काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.

मध आणि मलाईचा वापर

त्वचा खोलवर हायड्रेट करण्यासाठी मध आणि मलाई हा एक उत्तम उपाय आहे. मलाईमधील फॅट्स त्वचेला नैसर्गिक पोषण देतात, तर मध त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. मलाईमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवून टाका.

best home remedies for extreme dry skin during winter season
Kitchen Hacks : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या स्वच्छ करण्याच्या या 3 टीप्स जाणून घ्या

खोबरेल तेल

खोबरेल तेल हा त्वचेचा कोरडेपणा दूर करण्याचा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी अंगाला थोडे खोबरेल तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेतील ओलावा लॉक होतो आणि त्वचा दिवसभर मऊ राहते.

दूध आणि हळद

कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर आणि त्वचेवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि नैसर्गिक चमक येते. दूध त्वचेला आतून पोषण देण्याचे काम करते.

best home remedies for extreme dry skin during winter season
Diwali 2026 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रडल्यास संपूर्ण वर्षभर भोगावे लागते दुःख? जाणून घ्या यामागचे सत्य

कोरफड जेल

कोरफडीच्या जेलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर शुद्ध कोरफड जेलमध्ये थोडे खोबरेल किंवा बदामाचे तेल मिसळून त्वचेवर लावा. याच्या नियमित वापराने त्वचेची जळजळ आणि कोरडेपणा दूर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.