Diwali 2026 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रडल्यास संपूर्ण वर्षभर भोगावे लागते दुःख? जाणून घ्या यामागचे सत्य

diwali festival myths exposed : दिवाळीच्या पाडव्याच्या म्हणजेच गोवर्धन पूजेच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी रडल्यास किंवा दुःखी राहिल्यास संपूर्ण वर्षभर मानसिक क्लेश आणि दुःखाचा सामना करावा लागतो.
THE TRUTH BEHIND CRYING ON THE DAY AFTER DIWALI
THE TRUTH BEHIND CRYING ON THE DAY AFTER DIWALI saam tv
Published On: 

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोवर्धन पूजेबाबत अनेक अशा मान्यता प्रचलित आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असे म्हटले जाते की या दिवशी घरात रडणे किंवा दुःखी राहणे अशुभ मानले जाते. कारण अशी मान्यता आहे की व्यक्ती ज्या भाव आणि मनःस्थितीत हा दिवस घालवतो त्याचा प्रभाव त्याच्या संपूर्ण वर्षाच्या आयुष्यावर पडू शकतो. यामुळेच या दिवशी लोक आनंद साजरा करतात, घरात पूजा-अर्चा करतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात.

दिवाळीच्या मध्यरात्री महिला सूप आणि ताट का वाजवतात?

काही पारंपरिक मान्यत्यांनुसार, दिवाळीच्या रात्रीनंतर महिला सूप आणि ताट वाजवून घरातून अलक्ष्मी बाहेर काढतात. धार्मिक मान्यतेनुसार, अलक्ष्मी ही दरिद्रता, कलह आणि अशान्तीचे प्रतीक मानली जाते. अशा परिस्थितीत, सूप आणि ताट वाजवण्याची परंपरा घरातून नकारात्मकता आणि दरिद्रता दूर करण्याशी जोडली जाते. यानंतर दुसऱ्या सकाळी घरात गोवर्धन पूजेची तयारी सुरू होते.

THE TRUTH BEHIND CRYING ON THE DAY AFTER DIWALI
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच का गुंडाळले जातात? जाणून घ्या कारण

गोवर्धन पूजेच्या दिवशी गाईंना का सजवले जाते?

गोवर्धन पूजेच्या दिवशी गाईंचे स्नान करुन सजवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले गेले आहे. या दिवशी गाईंना टिळा लावला जातो, फुलांनी सजवले जाते आणि त्यांना विशेष पदार्थ खाऊ घातले जातात. भगवान श्रीकृष्णाचे गायी आणि गोपाळांशी विशेष नाते असल्यामुळे देखील या परंपरेला धार्मिक महत्त्व आहे.

THE TRUTH BEHIND CRYING ON THE DAY AFTER DIWALI
Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

भगवान विष्णु आणि राजा बळी यांच्याशीही जोडलेली आहे अशी मान्यता

गोवर्धन पूजेशी संबंधित काही धार्मिक परंपरांमध्ये भगवान विष्णूचा वामन अवतार आणि राजा बळी यांच्या कथेचाही उल्लेख आढळतो. मान्यतेनुसार, भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन राजा बळीकडे तीन पावले जमीन मागितली होती. त्यानंतर त्यांनी तीन पावलांमध्ये संपूर्ण सृष्टी मोजली. राजा बळीच्या भक्ती आणि दानशूरपणावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला विशेष वरदान दिले होते. ही कथा देखील दीपावली आणि त्याशी संबंधित धार्मिक परंपरांच्या संदर्भात आठवली जाते. पण गोवर्धन पूजेशी निगडित सर्वात महत्त्वाची श्रद्धा कोणती, हे अजून स्पष्ट झालेले नाही आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी व्यक्तीची मनःस्थिती जशी असते, त्याचा परिणाम तिच्या भविष्यावर होतो.

(टीप - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.