Pune Vande Bharat Express: ३ तासांचा प्रवास फक्त ५५ मिनिटांत होणार; पुण्यातूनही सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस

Pune To Sangali Hubali Vande Bharat Express : पुण्यात देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस
Vande Bharat ExpressSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

Pune Sangli Vande Bharat Express: पुण्यातूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे ते हुबळी या मार्गावर १५ सप्टेंबरपासून एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा तीन तासांचा प्रवास फक्त ५५ मिनिटांमध्येच पूर्ण होणार आहे. राज्यात लवकर विधानसभा निवडणुका असल्यामुळे काही शहरात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.

पुण्यात वंदे भारत एक्सप्रेस

१५ सप्टेंबर रोजी देशात १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार (Vande Bharat Express) आहेत. यामध्ये पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस समावेश आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक जलदगतीने रेल्वेने जोडले जाणार आहे. हुबळीहुन पहाटे पाच वाजता सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे, तर पुण्याहून हुबळीला दोन वाजून दहा मिनिटांनी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस रात्री पावणे अकरा वाजता हुबळीला पोहोचेल.

शहरांतर्गत कनेक्टिव्हिटी वाटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे एका कार्यक्रमात १० वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार (PM Modi) आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच दहा वंदे भारत ट्रेन एकाच वेळी सुरू होत आहेत. यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे देखील उद्घाटन होणार (Pune News) आहे. शहरांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ करणार असल्याची माहिती मिळतेय.

वंदे भारत एक्सप्रेस
Vande Bharat : वंदे भारतमधून ५० लाख घेऊन उतरला, सुटकेस घेऊन प्लॅटफॉर्मवर फिरत होता, पोलिसांनी हटकलं, पुढे...

अत्याधुनिक ट्रेन्समुळे प्रवासाचा वेळ वाचणार

भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, (Pune To Sangali Vande Bharat Express) अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहे. या अत्याधुनिक ट्रेन्समुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहेत. त्याचप्रमाणे ट्राफिकपासून देखील सुटका मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे ते हुबळी आणि पुणे ते सांगली या मार्गावर जलद गाड्या सुरू करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून केली जात होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी ते पुणे आणि पुणे ते हुबळी या मार्गाला मंजुरी दिलीय.

वंदे भारत एक्सप्रेस
Vande Bharat Sleeper Train: वंदे भारतमध्ये गरम पाण्याने अंघोळही करता येणार, नवी ट्रेन कशी आहे? जाणून घ्या वैशिष्ट्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com