Crime news X
देश विदेश

पैश्यांच्या बदल्यात मुलाला तारण ठेवलं, पण पैसे परत करायला गेलेल्या आईला जमिनीत पुरलेलं शव मिळालं, घटना वाचून डोळ्यात येईल पाणी

Crime : कर्जापायी एका आदिवासी कुटुंबाला मजूर म्हणून काम करावे लागले. पैश्यांची परतफेड न केल्याने मालकाने कुटुंबातील मुलाला तारण म्हणून ठेवले. कर्ज फेटण्यासाठी गेलेल्या महिलेला तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून समजले.

Yash Shirke

आंध्रप्रदेशमधील तिरुपती येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने फक्त २५,००० रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात महिला आणि तिच्या ३ मुलांना मजूर म्हणून ठेवले होते. आरोपीने महिलेच्या एका मुलाला जबरदस्तीने ओलीस म्हणून ठेवले होते. मुलाच्या मृत्यूनंतर आरोपीने मुलाचा मृतदेह तामिळनाडूतील कांचीपुरम येथे पुरला. त्या मुलाचा मृत्यू कावीळमुळे झाल्याचे म्हटले जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे कुटुंब यानाडी या आदिवासी समुदायाचे आहेत. महिलेचे नाव अंकम्मा असे आहे. अंकम्मा, तिचा नवरा चेंचाय्या आणि त्यांची ३ मुले तिरुपती येथील बदकपालन करणाऱ्या व्यक्तीकडे काम करत होते. चेंचाय्याच्या मृत्यूनंतर आरोपीने अंकम्मा आणि तिच्या मुलांना काम करायला भाग पाडले. त्यांनी पगार देण्यास नकार झाला. तेव्हा अंकम्माने निघून जाण्याची इच्छा व्यक्त केली.

अंकम्माने, तिच्या नवऱ्याने आरोपीकडून २०,००० रुपयांचे कर्ज घेतले होते. अंकम्माने काम सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आरोपीने २०,००० रुपयांच्या व्याजासह एकूण ४५,००० रुपयांची मागणी केली. पैसे परत करणे शक्य होत नसेल, तर एका मुलाला 'तारण' ठेव, असे आरोपीने अंकम्माला सांगितले. नाईलाजाने अंकम्माला ही अट मान्य करावी लागली.

अंकम्मा तिच्या मुलाशी फोनवर बोलत असे. मला इथून घेऊन जा, मला मालक खूप काम करायला लावतात असे अंकम्माचा मुलगा तिला फोनवर म्हणायचा. १२ एप्रिल रोजी त्यांचे संभाषण झाले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस, अंकम्माने पैशांची व्यवस्था केली. मालकाला संपर्क केला आणि मुलाशी बोलायचे आहे असे म्हटले. तेव्हा आरोपीने संकोच व्यक्त केला. संशय आल्याने अंकम्माने पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीदरम्यान आरोपीने अंकम्माच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी म्हणजेच बदक पालक करणारा अंकम्माचा मालक, त्याची पत्नी आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT