Crime News : घरी कुणी नसताना आत शिरला, २२ वर्षीय तरुणीचा गळा चिरला; साखरपुडा मोडणं पडलं महागात

Man Killed His Ex-fiancé : साखरपुडा मोडल्याच्या रागात एका तरुणाने धक्कादायक कृत्य केले आहे. ज्या मुलीशी तरुणाचे लग्न ठरले होते, त्या मुलीची तरुणाने हत्या केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime news
Crime newsX
Published On

साखरपुडा मोडणे एका २२ वर्षीय तरुणीला महागात पडले आहे. ज्या तरुणाशी लग्न ठरले होते, त्याने रागाच्या भरात तरुणीची हत्या केली. आरोपीने घरात शिरुन दिवसाढवळ्या गळा चिरुन तरुणीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपीची सध्या चौकशी सुरु आहे. ही घटना राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव शहनाज असे आहे. शहनाजच्या घरात घुसून आरोपीने तिचा खून केला. आरोपी आणि शहनाजचे लग्न ठरले होते. पण साखरपुडा मोडला. दोघांमध्ये आधीच वाद सुरु होता. ही हत्या वैयक्तिक शत्रुत्वातून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या लोकांची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

Crime news
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

दुपारी २ च्या सुमारास पोलिसांनी एका मुलीची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलाीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना घरातील एका खोलीत बेडवर शहनाजचा मृतदेह आढळला. तिच्यावर गळा धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी शहनाजची आई रुग्णालयात, तर वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने शहनाजवर हल्ला केला.

Crime news
Hagawane Family : फक्त सुनाच नाहीतर वडिलांनाही सोडलं नाही, राजेंद्र हगवणेने विकृतीची सीमाच गाठली

आरोपी तरुणाने २२ वर्षीय शहनाजवर हल्ला केला. शारदार शस्त्राने आरोपीने शहनाजचा गळा चिरला. या हल्ल्यामध्ये शहनाजचा जीव गेला. हत्या केल्यानंतर आरोपी तरुण पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले. लग्न मोडल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण त्यांचा साखरपुडा का मोडले यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

Crime news
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! १०० रुपयांत आता कुठेही, कधीही फिरता येणार; Pune Metro ची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com